आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क महागड्या शॅम्पेनने अंघोळ करते ही पाकिस्तानी लेडी; ऐशोआरामावर खर्च करते कोट्यवधी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश अब्जाधिश मोहम्मद जहूर यांची पत्नी कमालिया या चर्चेचा विषय बनल्या आहे. कारणही तसेच आहे. कमालिया यांना शॅम्पेनने अंघोळ करण्‍याचा छंद आहे. कमालिया आपल्या छंदावर कोट्यवधी रुपये खर्च करतात. आकर्षक दिसण्यासाठी कमालिया केवळ अंघोळीवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात.

 

दररोज अंघोळीसाठी लागतात 18-20 शॅम्पेनच्या बाटल्या...

- कमालिया अंघोळीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. कमालिया यांना दररोज अंघोळीसाठी 5000 रुपये किमतीच्या 18 ते 20 शॅम्पेनच्या बाटल्या लागतात. रिपोर्ट्सनुसार, कमालिया यांच्या सेवेत दिवस-रात्र 22 नोकर असतात. कमालिया यांचे पती नोकर्‍यांच्या पगारावर वर्षाला 1.94 कोटी रुपये खर्च करतात.

 

विवाहपूर्वी करायच्या मॉडेलिंग...
 - विवाहपूर्वी कमालिया यांचे नाव नताल्या शमरेनकोवा असे होते. त्या मॉडेलिंग करत होत्या. त्यांचा जन्म यूक्रेनमध्ये झाला होता. त्यांचा सर्वाधिक काळ रशियात गेला. पाकिस्तानात सध्या त्या चॅरिटी प्रोग्राममध्ये काम करतात.

 

कमालियाच्या गॉगलची किंमत 4 लाख रुपये..
- कमालिया रत्नजडीत घड्याळ वापरतात. एका घड्याळची किंमत 40 लाख रुपयांहून जास्त असते. त्यांच्या एका गॉगलची किंमत 4 लाख रुपये आहे. इतकेच नाही ती त्या वापरत असलेल्या हँडबॅगची किंमत 90 लाख रुप आहे.  वर्षभरात त्या बुट आणि चप्पलवर 20 लाख रुपयांहून जास्त खर्च करतात.

 

विदेश टूरसाठी 2 प्राव्हेट जेट
- कमालिया यांना पॅरिसमधील सर्वात मोठे हॉटेल सूट इंपेरियल रिट्जमध्ये थांबायला आवडते. या हॉटेलमध्ये एका रात्र राहायचे भाडे जवळपास 20 लाख रुपये आहे.
- विदेशात टूर करण्यासाठी कमालिया यांच्याकडे दोन प्रायव्हेट जेट आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... महागड्या दारुने अंघोळ करणार्‍या कमालिया यांचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...