आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inspirational Story Of Business Oberoi Who Saves Indians From Death & Jail By Spending Millions

जेल असो अथवा फाशी, सौदीमध्ये भारतीयांना वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपये उधळतो हा सरदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईमध्ये भारताचा असा एक बिझनेसमन आहे जे सौदी अरबमध्ये भारतीय लोकांना जेल अथवा फाशीपासून वाचवण्यासाठी करोडो रुपये उधळून लावतो. आम्ही सांगत आहोत भारतीय मुळचे एसपीएस ओबेरॉय यांचे. त्यांनी आतापर्यंत 80हून जास्त युवा मुलांना वाचवले आहे त्यात भारताच्या 50 मुलांचा समावेश आहे. ओबेरॉय चुकवतात ब्लडमनी..

 

सौदीच्या शरीया कायद्यानुसार हत्या केल्यानंतर त्या शिक्षेपासून वाचण्यासाठी पीडीत कुटुंबियांकडून सौदेबाजी करता येऊ शकते. यातील देण्यात येणाऱ्या रकमेला ब्लड मनी म्हणतात. जर पीडीताचे कुटुंबीय माफी देण्यास राजी झाले तर त्यांना पैसे देण्यात येतात. त्यानंतर फाशीच्या शिक्षेच्या माफीसाठी न्यायालयात अपील करता येते. अशा प्रकरणात फसलेल्या निरपराध लोकांची मदत करण्यासाठी ओबेरॉय मदत करतात.

 

2016 मध्ये 10 भारतीयांना फाशीपासून वाचवले...

भारतातल्या पंजाबमधून अबूधाबी जाऊन काम करणाऱ्या या मुलांना 2015 साली एका झडपेत एका पाकिस्तानी मुलाच्या हत्येत दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. ज्यानंतर 2016 साली अबूधाबीच्या अल अइन न्यायालयात या तरुणांची शिक्षा माफ करण्यासाठी ब्लड मनी जमा करण्यास मंजुरी दिली. हे ब्लड मनी एसपीएस ओबेरॉय यांनी चुकवले ज्याची किंमत 6.5 कोटी होती. 

दरवर्षी खर्च करतात कोट्यवधी रुपये..
- भारतीय युवकांच्या मदतीसाठी ओबेरॉय 36 कोटी रुपये खर्च करतात.

 

12 वर्षापूर्वी सुरु केले हे काम...
- ओबेरॉय यांनी एनजीओ सरबत दा भला यांच्या माध्यमांनी अनेक केसेस लढल्या आहेत. 2006 ते 2010 दरम्यान 123 युवकांना फाशीची शिक्षा आणि 40 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी शारजाह, दुबई, अबु धाबीमधील होते ज्यांची केस ओबेरॉय यांनी लढली. 
- यात अशा मुलांना शिक्षा दिली गेली जे आर्थिकदृष्ट्या कमजोर होते. इतकेच नाही त्यांच्याकडे वकिलासाठीही पैसे नव्हते तर ब्लडमनी देणे फार दुरची गोष्ट आहे. सरबत यांचे भला चॅरीटी ट्रस्ट यांची मदत करण्याचे काम करतात. 

 

आतापर्यंत 88 लोकांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवले..
ओबेरॉय सांगतात, आम्ही आतापर्यंत 88 युवकांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवले आहे आणि आता ते सर्वजण त्यांच्या-त्यांच्या घरी आहेत. यातील काही युवक पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि हैदराबादमधील होते. काही युवक पाकिस्तान आणि बांग्लादेशमधीलही होते. 

बातम्या आणखी आहेत...