आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखाली आले वासरु, गायीने लोकांकडे अशी मागितली मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई तिच्या मुलावर किती प्रेम करते, याची अगणिक उदाहरण बघता येतील. पण सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहेत, ज्यामध्ये एक गाय तिच्या वासरासाठी बैचेन झालेली दिसतेय. झाले, असे की तिचे वासरु एका कारखाली आले होते. या गायीने तिच्या वासराचे प्राण वाचावे, यासाठी असे काही केले, जे बघून तेथे उपस्थित असलेला प्रत्येक जण अचंबित झाला. दरम्यान तेथे हजर असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. 

 

वासरासाठी व्याकूळ झाली होती गाय... 
1 मिनिट 58 सेकंदांच्या या व्हिडिओत एका गायीचे वासरु कारखाली आलेले दिसत आहे. कारखाली येऊन देखील हे वासरु जीवंत राहिले. पण त्याला कारखालून बाहेर पडता येत नव्हते. हे बघून गाय तिच्या वासराला वाचवण्यासाठी इतकेतिकडे पळू लागली. गाय आणि वासराला बघून तिथे लोकांची गर्दी जमली. गाय बैचेन होऊन कारभोवती चक्करा मारत होती. इतकेच नाही तर कुणामुळे वासराला धक्का पोहोचू नये, यासाठी ती गाय लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करते, पण ती कुणालाही हानी पोहचवत नाही. तिथे उपस्थित लोकांनी कार बाजुला करुन वासराला सुखरुप त्यातून बाहेर काढले. वासराला बघून गायीच्या आनंदाला पारावार उरला नाही.  

बातम्या आणखी आहेत...