आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामध्ये लटकतो हा स्विमींग पुल, थ्रील आणि मस्तीमध्ये व्हॅकेशनसाठी परफेक्ट आहे हे ठिकाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत आपण अनेक ट्रांसपरंट ब्रीज आणि हँगिंग रेस्टॉरंट ऐकले आहेत. इंडोनेशियाच्या बाली येथे एक असे आयलँडवरील हॉटेल आहे जेथील स्विमींग पुल जगभरात चर्चेचा विषय बनलेले आहे. याची खासियत ही आहे की आपण एकदातरी याठिकाणी जरुर यायला हवे. हवेत लटकला आहे हा स्विमींग पुल...

 

बाली येथील एका आयलँडवरील हे स्विमींग पुल उंच पहाडाच्या कोपऱ्यावर बसलेले आहे. 21 फुटांचे हे स्विमींग पुल हवेत लटकत आहे. याच्याखाली ट्रांसपरंट ग्लास लागलेले आहे आणि तेथून याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पुलाच्या खाली लावण्यात आलेली काच जवळपास 3.5 फूट आहे जेथून 500 फुट खाली असलेल्या समुद्राचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. 

 

3 एकरमध्ये पसरलेले आहे रिसॉर्ट...

हे रिसॉर्ट जवळपास 3 एकरमध्ये पसरलेले आहे. यात 4 विला, 3 जीम, 1 थिएटर, स्पा सेंटर आणि बार आहे. याशिवाय प्रत्येक व्हिलाला त्याचे प्रायव्हेट स्विमींग पूल आहे. 

 

इतके आहे भाडे..
येथे एक रात्र घालवण्यासाठी तुम्हाला तब्बल 950 डॉलर्स म्हणजेच 60 हजार रुपये मोजावे लागतील. पार्टी करण्यासाठी येथे 10 बेडरुमचे चार व्हिला बुक करता येऊ शकतात. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या अनोख्या रिसॉर्टचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...