आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षापासून सुट्टे पैसे जमा करत होता, बँकेत पोहोचल्यावर मिळालेली किंमत पाहून वाटेल आश्चर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीजण सेव्हिंग करण्यासाठी सुट्टे पैसे खर्च न करता ते जमा करत राहतात. जास्तीत जास्त दोन वर्षासाठी आपण हे करु शकतो पण एका माणसाने तर हद्दच केली आणि तब्बल 45 वर्षे त्याने सुट्टे पैसे जमा केले. या सुट्टया पैशांना त्याने बॅरल्समध्ये भरुन 45 वर्षापर्यंत ठेवले. एक दिवस त्याने हे सर्व पैसे बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जे घडले ते बँकेसाठी डोकेदुखी ठरली. काय झाले बँकेमध्ये...

 

- लुसियाना येथे राहणाऱ्या ओथा एँडर्सने 45 वर्षानंतर त्याचे अनोखे कलेक्शन बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याने जमा केलेले सुट्ट्यांनी 12 बॅरेल्स भरले होते. जेव्हा हे घेऊन तो बँकेत गेला तेव्हा तेथील सर्व कर्मचाऱ्यांचे डोळेच फिरले.

 

चिल्लर मोजण्यासाठी लागले 5 तास..
- एंडर्सने बँकेला त्याचे हे चिल्लर पैसे कॅशमध्ये देण्यास सांगितले. त्याचे नशीब होते की बँकेने त्याच्याजवळील हे सर्व पैसे घेण्यास सहमती दर्शविली. पण जेव्हा चिल्लर मोजायला सुरुवात केली तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 5 तास लागले. 

 

इतकी होती किंमत...
- चिल्लर घेतल्यानंतर ते काही हजार रुपये असतील असे सर्वांना वाटत होते पण जेव्हा आकडा समोर आला तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांची झोप उडाली. ती राशी होती जवळपास 3.5 लाख रुपये.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कशी मोजण्यात आली चिल्लर...

बातम्या आणखी आहेत...