आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकामात सापडलेला रहस्यमयी दगड घरी घेऊन आला मजूर, परंतु त्याच्यामागे पडले माफिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड कर'. ब्राझीलच्या एका खाणीमध्ये काम करणाऱ्या मजुरासोबत असेच काहीसे घडले आहे. या मजुराला खाणीत खोदकाम करताना एक दगड आवडला, तो त्याने मित्रांच्या मदतीने बाहेर काढला आणि घरी घेऊन आला. परंतु त्याने विचारही केला नसेल की, दगड समजून घरी आणलेल्या त्या गोष्टीची किंमत 3 हजार कोटी रुपये असेल. एवढेच नाही तर या दगडामुळे त्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो आणि यासाठी त्याला सिक्युरिटी एजन्सीजची मदत घ्यावी लागेल.


360 किलोचा मौल्यवान दगड
- ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एफजी नामक व्यक्तीला खोदकाम करताना पन्ना रत्नाचा मोठा तुकडा दिसला. हा मोठ्या दगडाच्या आकारात होता आणि यामध्ये सर्व बाजूला पन्ना लागलेले होते. याचे वजन 360 किलो होते. बाजारात याची किंमत  319 मिलियन डॉलर (3 हजार कोटी) सांगण्यात आली. मग काय, एका मजुराला एवढ्या किमतीचा दगड सापडल्याची बातमी सर्वत्र पसरताच माफिया त्याच्या मागे पडले.


नाव बदलून राहत आहे हा व्यक्ती 
आत्तापर्यंत ज्या-ज्या खाणींमधून पन्ना रत्न मिळाले या सर्वांमध्ये हा सर्वात मोठा होता. ब्राझीलमध्ये ड्रग माफिया आणि गुंडांची चांगलीच दहशत आहे. यामुळे या खाद्यासाठी त्याच्या कोणीही खून करू शकतो अशी त्याला भीती आहे. यामुळे त्याने स्वतःचे नाव बदलून घेतले. ज्या व्यक्ती किंवा कंपनीने हा दगड खरेदी केला, त्याची ओळखही गुप्त ठेवण्यात आली. रेकॉर्डनुसार त्या व्यक्तीने आपले नाव बदलून एफजी ठेवले आहे.


कोठून निघाला हा खजिना
हा मौल्यवान दगड नॉर्थ-इस्ट ब्राझीलमध्ये असलेल्या बाहियाच्या कार्नेबा खाणीत आढळून आला. हा संपूर्ण परिसर अशा मौल्यवान रत्नांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु एवढा मोठा खजिना हाती लागेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...