आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्राझीलच्या रिओ द जनेरो शहरातील एक व्यक्ती मागील 22 वर्षांपासून जगापासून अलिप्त एका वाळूच्या महालात राहत आहे. 44 वर्षीय Marcio Mizael Matolias स्वतःला राजा समजतात. विशेष म्हणजे जवळपासचे काही लोक यांना राजा म्हणतात तर काही लोक यांना पाहून सनकी म्हणतात.
डोक्यावर नेहमी असतो मुकुट
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्कियोने आपल्या अनोख्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. मार्कियोने त्याला समुद्र खूप आवडतो असे सांगितले. लोक अशा बीचवर राहण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात, घर विकत घेतात परंतु मी येथेच हा आनंद घेतो. यामुळे मी या वाळूच्या महालात राहत आहे. या बीचवर येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्कियो एखाद्या सेंटर ऑफ अट्रेक्शनपेक्षा कमी नाही. या महालाच्या बाहेर डोक्यावर मुकुट घालून शाही खुर्चीवर हे बसून असतात.
दररोज शिंपडावे लागते पाणी
मार्कियोने सांगितले की, आपला हा वाळूचा महाल सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला दररोज यावर पाणी शिंपडावे लागते. या महालाची तो दिवसरात्र डोळ्यात तेल घालून देखरेख करतो.
असे जीवन जगत आहे
- जवळपासच्या लोकांनी सांगितले की, मार्कियोला आम्ही खूप वर्षांपासून येथे राहत असल्याचे पाहत आहोत. हे लोकही त्याला 'द किंग' म्हणतात. लोकांनी सांगितले की, मार्कियो फक्त तीन गोष्टी करत आपले आयुष्य जगत आहे, मासे पकडणे, पुस्तक वाचणे आणि गोल्फ खेळणे.
पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.