आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात लठ्ठ कुटुंब, यांच्या वजनावर विश्वास ठेवणे अशक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
43 वर्षांचा ड्रू स्टूअर्ट - Divya Marathi
43 वर्षांचा ड्रू स्टूअर्ट

खाण्याचा असाही काय शौक की, शरीराचे वजन एक कारपेक्षा जास्त वाढावे? विश्वास बसत नसेल तुमचा परंतु या 3 भाऊ-बहिणेचे वजन जवळपास 907 Kg आहे. या अवाढव्य लठ्ठपणाचे कारण आहे यांचे खाणे. आश्चर्याची आणखी एक गोष्ट म्हणजे अशा खाण्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो हे ही  यांना माहिती आहे, तरीही यांना यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवता येत नाही.


तीन वर्षांपासून घराबाहेर पडलेले नाहीत...
- या जीवघेण्या लठ्ठपणामुळे 49 वर्षांचा चिटोका, 30 वर्षांची निओमी आणि 43 वर्षांचा ड्रू स्टूअर्ट तीन वर्षांपासून घराबाहेर पडलेले नाहीत.
- एक न्यूज चॅनलने नुकतीच या तिघांवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. डॉक्युमेंट्रीचे नाव आहे Family By The Ton। लठ्ठपणामुळे हे तिघेही कशाप्रकारे आयुष्य जगात आहेत, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.
- डॉक्युमेंट्रीमध्ये यांनी सांगितले की, हे कोणत्याच सामान्य कारमध्ये बसू शकत नाहीत आणि यामुळे हे तीन वर्षांपासून कुठेही गेलेले नाहीत. यांनी आता स्वतःसाठी एक मॉडिफाइड कार बनवून घेतली आहे.
- या तिघांमध्ये सर्वात जास्त 304kg वजन हे 43 वर्षीय स्टूअर्टचे आहे. स्टुअर्ट दिवसभर पिझ्झा खात राहतो. परंतु आता त्याच्या लक्षात आले आहे की, ही सवय त्यांना मृत्यूच्या जवळ घेऊन आली आहे. स्टुअर्टने सांगितले की, मला समजत नाहीये की आम्ही आमच्या आयुष्यासोबत असा खेळ का केला. आता आम्हला लवकरच काहीतरी करावे लागेल.
डॉक्टरांनी दिली आहे इशारा
- या तिघांनी स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एक डॉक्टरांची मदत घेतली आहे. डॉक्टर चार्ल्स प्रॉक्टर यांच्यानुसार तिघांनीही स्वतःहाचे आयुष्य मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. लवकर सर्जरी केली नाही तर यांचा केव्हाही मृत्यू होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर पाहा, यांचे थक्क करणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...