आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बेटाजवळ मनुष्याने फिरण्यास आहे बंदी, यामागे आहे भयानक सत्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राजीलच्या  Ilha da Queimada Grande बेटावर कोणत्याही व्यक्तीने पाय ठेवण्यास बंदी आहे. या बेटाच्या आजुबाजूलाही जाण्यास सरकारने मनाई केली आहे. ब्राजीलच्या साओ पालो स्टेटच्या सँटॉस शहराच्या तटापासून जवळपास 90 मैल दूर हे द्वीप आहे. हे अटलांटिक सागरात आहे. परंतू तुम्हाला प्रश्न पडला असेल की, येवढे सुंदर बेट पाहण्यास सरकारने का बंदी घातली असेल. तर आज आम्ही तुम्हाला यामागिल कारण सांगणार आहोत. आयलँडवर आहेत असे धोके...


- ब्राजील सरकारनुसार आयलँड खुप घातक आहे. येथे कोणत्याही वेळी जीव जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार 130 एकरच्या बेटावर 4.5 लाख गोल्डन लांसहेड वाइपर साप आहेत. ही सापांची जगातील सर्वात विषारी प्रजाती आहे. 
- म्हणजेच या बेटावर प्रत्येक स्क्वेयर मीटरवर तुम्हाला एक वायपर साप दिसून येईल. अशा परिस्थितीत येथे जिवंत राहणे अशक्य आहे. एक्सपर्ट्स नुसार हा साप कुणाला चावला तर आपण हॉस्पिटलपर्यंतही पोहोचू शकत नाही. हा साप चावल्याबरोबर व्यक्तीचा मृत्यू होतो. हे झाडांवर चढून घरट्यांमधील चिमण्याचीही शिकार करतात.

 

हे चावताच गळते मांस
ब्राजीमध्ये सर्पदंश होणा-या 90 टक्के लोकांचा मृत्यू गोल्डन लान्सहेड चावल्यामुळे होतो. लाहा डा क्विमाडा ग्रँडमध्ये हे साप जलद पसरतात. सामान्यतः हे अर्धा मीटरचे असतात. हे खुप शक्तिशाली असतात. शरीरावर ज्या ठिकाणी हा साप चावतो. तेथील मास गळून पडते. ब्राजीलच्या नेव्हीने स्नेक आयलँडमध्ये जाण्यास लोकांना मनाई केलीय.

 

लाखांमध्ये विकते विष 
एक गोल्डन लांसहेडपासून 18 लाख रुपयांचे विष : हे साप जगातील दुर्मिळ सापांपैकी आहेत. मार्केटमध्ये या सापांना खुप मागणी आहे. एक गोल्डन लान्सहेड सापामधून 18 लाखांचे विष निघते. ब्राजीलच्या स्नेकलँडमधून या सापांची स्मगलिंग होण्याचा धोकाही आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या बेटावरील अजून एक मोठा धोका...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)