आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टनमध्ये घडली चमत्कारीक घटना, आकाशात उडताना दिसली बिल्डींग, लोकांनी घातली तोंडात बोटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन येथे मंगळवारी सकाळी असा काही नजारा पाहायला मिळाला की सर्वजण आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. जगभरात प्रसिद्ध असलेले वॉशिंग्टन मॉन्युमेंट आकाशात तरंगताना दिसले. हे विचित्र दृश्य लोकांनी लगेचच त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. या कारणाने झाले असे...

 

वॉशिंग्टन येथे भयानक थंडी पडली आहे आणि त्यामुळे येथे सर्वत्र धुके परसलेले आहे. येथील ओळख असलेले वॉशिंग्टन मॉन्युमेंट पूर्णपणे झाकले गेले होते. दूरून पाहताना ही इमारत एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाप्रमाणे हवेत उडताना दिसली. शुन्यावर गेलेल्या तापमानामुळे येथे अगदी जवळचे दृश्यही लोकांना पाहता येत नव्हते. 

 

सोशल मीडीयावर झाले ट्रेंड..
हवेत उडणारे वॉशिंग्टन मॉन्युमेंट क्षणाधार्त सोशल मीडियावर ट्रेंड झाले आणि सर्वत्र शेअर झाले. काही लोकांनी याबाबत अफवाही पसरवण्यास सुरुवात केली पण लवकरच खरे कारण समोर आले. 

 

माइनस 73 पर्यंत गेला पारा 
- अमेरिका येथे सध्या जबरदस्त थंडी आहे. येथील अनेक हिस्स्यांमध्ये पारा मायनस 35 पर्यंत गेला आहे. बॉम्ब सायक्लोनमुळे देशाच्या अनेक हिस्स्यात खूप बर्फही पडला आहे, बोस्टनमध्ये तर पूरही आला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, वॉशिंग्टनमध्ये कसा होता नजारा...

बातम्या आणखी आहेत...