आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90च्या दशकात जन्मलेले लोक या 9 गोष्टी नक्कीच विसरले नसतील, एकदा वाचून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मेसेजने तुम्हाला अनेकदा सतावले असेल. - Divya Marathi
या मेसेजने तुम्हाला अनेकदा सतावले असेल.

90च्या दशकात जन्मलेले लोक हे अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. फेसबुकआधी जन्माला आलेल्या या हू आणि ऑर्कुटसारख्या सोशल साइट्सचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. तर, दुसरीकडे मोबाइलच्या सुरुवातीच्या व्हर्जनपासून आजच्या टचस्क्रिन पर्यंतची स्थित्यंतरे त्यांनी पाहिली आहेत. अनुभवली आहेत. तंत्रज्ञान सहज आणि सोपे होतांना तुम्ही पहिले असेल. पूर्वी मोबाइल इनबॉक्स हे मेसेजने फूल्ल होऊन जात होते. नवीन मेसेज आला की फक्त पत्राचे चिन्ह तेवढे दिसत होते, मेसेज काय आला हे कळण्यासाठी आधीचे मेसेज डिलिट करावे लागत आणि त्यानंतर नवा मेसेज दिसत होता. 

 

इंटरनेट ही तर फक्त श्रीमंतांची चैन होती... 
- आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. दोन-पाच वर्षांची मुलं-मुलीही नेट सर्फिंग आणि गेमिंग करताना दिसत असतात. परंतू 90च्या दशकातील लोकांना विचारा की तुम्हाला इंटरनेट एवढे सहज उपलब्ध होत होते का? 
- फेसबुक अकाऊंट असणे आज सामान्य बाब झाली आहे. त्याआधी या हू आणि ऑर्कुट या सोशल साइट्स होत्या. त्यावेळी इंटरनेटची स्पीड ही जणू डोकेदुखी होती. 
- ऑर्कुटसारख्या सोशल साइट्सवर कोणाशी मैत्री झाली जरी, तरी त्याला मेसेज पाठवणे हे दिव्य होते. फिल्म आणि गाणे डाऊनलोड करणे तर जणू स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव होता. 

मोबाइल नाही, जणू टाइप रायटर होते 
- त्याकाळात आजच्या सारखे टचस्क्रिन मोबाइल नव्हते. किंवा क्वॉर्टी किपॅडही नव्हते. ए टू झेड प्रत्येक शब्द बोटांनी टाइप करावा लागत होता. जणू मोबाइल नाही आपण टाइप रायटरच हताळत होतो. 

 

फोनला नव्हते कॉलर आयडी 
- तो काळ म्हणजे मोबाइलची सुरुवात होती. तेव्हा लँडलाइनची चलती होती. चौका-चौकात एसटीडी, पीसीओ बुथ होते. 
- लँडलाइन फोनला तेव्हा कॉलर आयडी नव्हते. त्यामुळे अनेक जण फक्त रिंग देऊन त्रास देण्याचेही काम करत होते. तुमच्या पैकी अनेकांनी हे एकदा नक्कीच केले असेल. 

 

प्रेमी युगुलांना वाटायचे कोणला काय कळते...
- प्रेमी युगुल तासन् तास फोनवर गप्पा मारात. त्यांचा समज असायचा की कोणाला काय कळणार कोण एवढे बोलले, परंतू जेव्हा महिन्याच्या शेवटी फोनचे बील घरी येत होते तेव्हा सर्व पोलखोल होत होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये, पाहा कसे होते 90च्या दशकातील दिवस... 

बातम्या आणखी आहेत...