आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघता-बघता म्हातारी दिसू लागली आहे 28 वर्षांची ही तरुणी, या कारणामुळे झाली अशी अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कॅलिफोर्नियाची 28 वर्षीय एका हेल्थ ब्लॉगरचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बेथनी नावाची ही तरुणी आता अक्षरशः म्हातारी दिसू लागली आहे. तिच्या शरीरातील मसल्स गायब होत असून हाडे दिसू लागली आहेत.

 

हे आहे कारण

- बेथनी नावाच्या हेल्थ ब्लॉगरने सोशल मीडियावर स्वतःविषयी लिहिताना सांगितले, की ती 15 वर्षांची असताना तिला पोटाचा आजार जडला होता. तिला कायम गॅसेसचा त्रास जाणवायचा. पण वयाची पंचविशी ओलांडल्यानंतर जेव्हा माझी अशी अवस्था व्हायला लागली, तेव्हा यामागे दुसरेच कारण असावे, असे माझ्या लक्षात आले. 

- बेथनीने सांगितले, की तिला Irritable bowel syndrome (IBS) नावाचा आजार जडला आहे. एक जीवघेणा आजार असून या आजारात व्यक्तीच्या शरीरात जेवण डायजेस्ट होणे बंद होते. या आजारामुळे खाल्लेले अन्न पचत नाही. 


सोडावी लागली नोकरी..
- बेथनी हेल्थ ब्लॉगर होण्यापू्र्वी एका मीट एक्सपोर्ट कंपनीत मार्केटिंग हेड होते. 2015 मध्ये तिचे वजन अचानक कमी होणे सुरु झाले होते, त्यामुळे तिला नोकरी सोडावी लागली.


पुढे बघा, बेथनीचे पूर्वी आणि आताचे फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...