आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांच्या प्रेग्नेंसीमध्ये सुरु झाल्या प्रसुती वेदना, नॅचरल मिसकॅरेजसाठी 48 तास पाहिल्याने गमावले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा डॉक्टरांच्या चुकांमुळे रग्णांना जीव गमवावा लागतो. इग्लँडमध्ये राहणा-या दोन मुलांची आई असलेल्या रीता सैधा यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बळी गेला. रीता यांना प्रेग्नेंसीच्या तिस-या महिन्यात प्रसुती वेदना सुरु झाल्या. परंतू यानंतरही डॉक्टरांनी अबॉर्शन करण्यास नकार दिला. डॉक्टर्स हे नैसर्गिक पध्दतीने मिसकॅरेज होण्याची वाट पाहत होते. परंतू यामुळे तिला भयंकर इन्फेक्शन झाले आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चेम्सफोर्डमध्ये इन्क्वायरी झाली. 

 

परिस्थिती बिघडल्यावर सर्जरी
38 वर्षांची रीता 15 आठवड्यांपासून प्रेग्नेंट होत्या. त्यांना प्रसुती वेदना झाल्यावर बेलिस्डन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टर्सने सर्जरीची तयारी करण्यापुर्वी रीताला 24 ते 48 तास नैसर्गिक पध्दतीने मिसकॅरेज होण्याची वाट पाहाण्यास सांगितले. याच काळात त्यांची तब्येत बिघडली आणि शरीरात सेप्सिस डेव्हलप होऊ लागले. हे एक प्रकारचे इन्फेक्शन होते. 5 दिवसात 17 सप्टेंबरच्या आत त्यांची परिस्थिती खुप बिघडली. ब्लड प्रेशर लो, टेम्प्रेचर हाय, हाय पल्स रेट आणि छातीत वेदना होत होत्या. त्यांना दवाखान्यात दाखल केले तेव्हा असे काहीही होत नव्हते. त्यांना नंतर डॉक्टरांनी तात्काळ सर्जरीसाठी नेले आणि बाळाला काढले. यानंतर त्यांना इन्टेंसिव्ह केअरमध्ये ट्रान्सफर केले आणि लाइफ सपोर्टवर ठेवले. परंतू पुढच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. 


पती म्हणाले- सेप्सिसविषयी माहिती नव्हते
रीताचे पती 41 वर्षांच्या भूषणने सांगितले की, डॉक्टरांनी आम्हाला रीताच्या ख-या कंडीशनविषयी सांगितले नव्हते. डॉक्टर्स वेळोवेळी मला पत्नीच्या तब्येतीविषयी सांगत होते. परंतू त्यांनी मला सेप्सिसविषयी सांगितले नाही. नंतर मी डॉक्टरांना याविषयी बोलताना ऐकले. तेव्हा त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करताना याविषयी सांगितले. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला नसता तर माझ्या पत्नीचे प्राण वाचले असते.


सर्जरी करणे खुप रिस्की
रीताच्या कंडीशनला मॉनीटर करणा-या सीनियर डॉक्टर शाहीन मनन यांनी यावर स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या काळात सर्जरी करुन बाळ काढणे खुप रिस्की असते. आम्ही प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या काळात सर्जरी करण्यासाठी ट्रेंड नसतो. यामुळे सर्जरीचा निर्णय योग्य नव्हता. त्या म्हणाल्या की, रीतासुध्दा नॅचरल टर्मिनेशनसाठी तयार होत्या. डॉक्टरांनी आपले स्पष्टीकरण देत सांगितले की, रीता यांना दवाखान्यात अॅडिमिट झाल्यावर किंवा नंतर काहीच वेदना झाल्या नाही.


जीवघेणे आणि हानिकारक इन्फेक्शन

सेप्सिस एक प्रकारचे इन्फेक्शन आहे आणि यामुळे शरीरात खुप जलद गतीने बॅक्टेरिया पसरतात. यामधून निघणारे टॉक्सिन्स जखमांमध्ये जातात आणि शरीराच्या इतर अंगांना नुकसान पोहोचवतात. यामुळे अनेक अंग काम करणे बंद करु शकतात. अशा वेळी यावर योग्य उपचार झाले नाही तर इन्फेक्शन जीवघेणे ठरु शकते. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...