आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे बापरे! शिकागोत गोठल्या नद्या, तर सिडनीत आग ओकणारी उष्णता, मोडले अनेक रेकॉर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागोत गोठलेल्या नदीत फसलेली एक बोट. - Divya Marathi
शिकागोत गोठलेल्या नदीत फसलेली एक बोट.

एकीकडे शिकागोसहित पूर्ण उत्तर अमेरिका विक्रमी थंडीने गारठली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियात गरमीने 79 वर्षांचा उच्चांक तोडला आहे. शिकागोत -50 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान घसरल्याने नद्याच्या नद्या गोठल्या आहेत, दुसरीकडे सिडनीत 47 डिग्रीपर्यंत पारा पोहोचल्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा उष्ण दिवस नोंदवण्यात आला आहे. 

 

10 कोटी लोकांना थंडीचा तडाखा...
- थंडीचा कहर एवढा आहे की, पूर्ण नॉर्थ अमेरिका एका डीप फ्रीजरमध्ये बदलली आहे. आणि तब्बल 10 कोटी लोकसंख्या या जीवघेण्या थंडीशी संघर्ष करत आहे. नुकत्याच्या आलेल्या बॉम्ब साइक्लोनमुळे यूएस आणि कॅनडामध्ये 22 मृत्यू झालेले आहेत.

 

मोडला 80 वर्षांचा विक्रम
- सातत्याने घटणाऱ्या तापमानामुळे कॅनडा आणि बॉस्टनमध्ये अनेक नद्या गोठल्याचे वृत्त येत आहे. शिकागोमध्ये थंडीने 80 वर्षांचा विक्रम ध्वस्त केला आहे.

 

स्पेन हायवेवर रेस्क्यू ऑपरेशन
- स्पेनमध्ये हिमवादळानंतर हजारो लोक हायवेवर अडकले होते. त्यांना मजबुरीने आपल्या गाड्या सुरू ठेवून रात्र काढावी लागली. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करून हायवेवरून लोकांना काढण्यात आले.

 

सिडनीत ठीक उलट परिस्थिती...
- ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत 79 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस नोंदवण्यात आला. येथे उष्णतेने एवढा कहर केला की, रविवारी तापमान 47.3 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले. याआधी 1939 मध्ये येथे एवढा तापमानाचा पारा होता.

 

पूर्ण सिडनीत फायर अलर्ट

- वेगाने वाढणाऱ्या तापमानाने आग लागण्याच्या शक्यता खूप वाढल्या आहेत. यानंतर पूर्ण सिडनीत फायर अलर्ट जारी करण्यात आले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, शिकागोतील काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...