आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलँडमधील या शहरात शाळकरी मुलींना वेश्यावृत्ती ढकलतात खुद्द पोलीस,आहेत 1000 मसाज पार्लर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर थायलँड येथे Mae Hong Son याठिकाणी कमी वयातील मुलींना वेश्यावृत्तीत ढकलण्याचे काम तेथील पोलीसच करतात. नुकताच येथे एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे ज्यात हे सत्य समोर आले आहे. थायलँड येथे असणाऱ्या एका सीनीअर ऑफिसरनेच हे काम केल्याने नंतर समोर आले. सोशल वर्कर्सच्या मदतीने हा खुलासा करण्यात आला आहे. लहान मुलींना पैशांचे लालच देऊन त्यांच्या गरीबीचा फायदा घेतला जातो. या शहरात जवळपास 28 लाख वेश्या आहेत. तर त्यात 40 हजार टीनएज मुलांचा समावेश आहे.

 

हफ्त्यातून 10 वेळेस पाठवले जाते कस्टमर्सकडे..
एका मुलीने बँकॉक पोस्टला सांगितले की, तिला जवळपास आठवड्यातून 10 वेळेस व्हीआयपी कस्टमर्सकडे पाठवण्यात येते. यातील बहुतांश लोक हे राजकारणी असतात. एकदा तर तिला तिच्या शाळेतील शिक्षकाबरोबर सेक्स करावा लागला होता. घरात असताना कधीही कॉल केला जातो आणि बोलावले जाते जर नाही गेले तर लोकांना घरी शोधण्यासाठी पाठवले जाते. 

 

पोलिसावर लागले 320 वर्षाचा तुरुंगवास...
सेक्स रॅकेट चालणारा पोलीस Yutthachai Thongchai ला 320 वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे. थायलँडमध्ये जास्तीत जास्त 50 वर्षाची शिक्षा होऊ शकते पण त्याच्यावर इतके कलम लागले की त्याला 320 वर्षे शिक्षा झाली.

 

शहरात आहेत 1000 मसाज पार्लर..
मसाजच्या नावाखाली वेश्यावृत्ती या शहरात सर्रासपणे सुरु असते. शहरात 1000हून जास्त मसाज पार्लर आहेत. त्यावरुन पूर्ण देशात काय होत असेल याचा अंदाजा आपण घेऊ शकता. केवळ मसाज पार्लर नाही तर बारमध्येही एस्कॉर्ट उपलब्ध असतात. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, थायलँडमध्ये चालणाऱ्या वेश्यावृत्तीचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...