आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सेनेच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील, जाणुन वाटेल अभिमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशाची आन बान आणि शान असलेली आपली भारतीय सेना कठीण परिस्थितीतही देश सेवा करण्यात तत्पर आहे. भारतीय सेनेविषयीच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या जाणुन तुम्हाला अभिमान वाटेल. याच सैनिकांमुळे आपण आज आरामात झोपू शकतो. आज आम्ही तुम्हाला भारतीय सैनिकांविषयी काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी जाणुन घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात उंच सुरक्षा सीमेचे रक्षण...


भारतीय सेना जगातील सर्वात उंचीवर असलेल्या सीमा रेषेचे रक्षण करणारी पहिली सेना आहे. सियाचीन ग्लॅशियर या ठिकाणी हाड गोठावणा-या थंडीतही हे जवान रक्षणासाठी सदैव तैनात असतात. ही सीमा समुद्रच्या तलावापासून 5 हजार मीटर उंचीवर आहे. ही जगातील सर्वात उंच सीमा आहे.

 

जगातील सर्वात मोठी वॉलंटियर मिलिट्री
भारतीय सेनेला जगातील सर्वात मोठ्या वालेंटिअर मिलिट्रीचा दर्जा प्राप्त आहे. भारतीय सेना ही स्वयंसेवी बळावर आहे. यामध्ये देशातील सक्रिय सुरक्षा जवानांमध्ये 80 टक्के वाटा आहे. सेनेजवळ 12 लाखांपेक्षा जास्त सक्रिय सैनिक आहे आणि 9 लाखांपेक्षा रिसर्व्ह फोर्स आहेत. यासोबतच ही जगातील सर्वात मोठी स्थायी सेना आहे.


भारतीय सेनेने बनवलाय जगातील सर्वात उंच ब्रिज
- भारतीय सेनेच्या नावावर जगातील सर्वात उंच पुल बनवण्याचा रेकॉर्ड आहे. या ब्रिजचे नाव बेली ब्रिज आहे. हा ब्रिज हिमालयाच्या टोकावर 18 हजार 379 फूट उंचीवर बनवला आहे. 98 फूटांचा हा ब्रिज द्रास आणि सुरु नदीच्या मध्ये बनवला गेलाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भारतीय सेनेविषयी रंजक गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...