आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमदर्शनी खरे वाटणार नाहीत हे फोटो, आश्चर्यकारक आहे मुलांचा लवचिकपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क सिटी, अमेरिकेचे पोर्ट्रेट आणि डान्स फोटोग्राफर जॉर्डन मॅटर यांचे फोटो जगभरातील प्रसिद्ध वेबसाईट आणि वृत्तपत्र मासिकांमध्ये प्रकाशित होत असतात. यापूर्वी जॉर्डन यांच्या अनेक फोटोंच्या सिरीजची चर्चा झाली आहे. त्यात डान्सर्स अमाँग अस, डान्सर्स आफ्टर डार्क आणि अॅथलिट्स अमाँग अस याचा समावेश आहे. नुकतेच त्यांनी त्यांची मुले हडसन आणि सॅलिश यांच्याकडून प्रेरणा घेत एक फोटो सिरीज तयार केले. त्याला त्यांनी टायनी डान्सर्स अमाँग अस असे नाव दिले आहे.

 

अशी आहे सिरीज..
- मुलगा हडसनबरोबर खेळताना जॉर्डन यांना अशा प्रकारचे फोटो क्लिक करण्याचा विचार आला. त्यांची मुलगी सॅलिश बर्फात खेळत असताना त्यांना टायनी डान्सर्स हे नाव सुचले. 
- जॉर्डन यांनी त्यांच्या या फोटो सिरीजला पुस्तकाचे रुपही दिले आहे. त्यात त्यांनी मुले किती बिनधास्त, खिलाडू वृत्तीचे आणि तेवढेच निरागस असतात हे दाखवले आहे. 
- या फोटो सिरीजमध्ये मुलांच्या रोजच्या अॅक्टीव्हिटीज मुलांच्या डान्सच्या पोजमध्ये दाखवल्या आहेत. मुलांचे टायमिंग आणि त्यांची लवचिकता आश्चर्यकारक आहे. 
- जॉर्डन यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम पेजवरून लोकांना याबाबत माहिती मिळावी म्हणून हे फोटो साभार घेतले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जॉर्डन मॅटर यांनी क्लिक केलेले काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...