आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2BHK फ्लॅटइतका मोठा आहे हा देश, शिक्षण फ्री आणि टॅक्सचीही चिंता नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी विचार केला आहे का की 100 वर्ग मीटरसारख्या छोट्या जागेतही एक देश निर्माण होऊ शकतो. विश्वास होत नसेल पण हे खरे आहे. यूरोपमध्ये काही लोकांनी 100 वर्गमीटर जमिनीच्या तुकड्याला एक देश घोषित केले आहे. स्लोवेनिया आणि क्रोएशिया सीनेवर लोकांना एक स्वयंभू देश बनवला आहे आणि त्याला 'किंगडम ऑफ एंक्लावा' असे नावही दिले आहे. मागच्या आठवड्यात येथे 800 एंक्लावा नागरिकांनी या देशाला व्हर्चुअल पद्धतीने निवडून आणले आहे आणि मंत्र्यांचीही निवड केली आहे. एका माणसाने लढविली ही शक्कल...


- या जागेला देशात बदलवणाऱ्या माणसाचे नाव आहे प्यॉत्र वारजेंकीविज. प्यॉत्र आणि त्यांच्या काही मित्रांना जेव्हा कळाले की स्लोवीनीयाच्या मेटलिका शहराजवळ क्रोएशियाची राजधानी जागरेबपासून जवळपास 50 किमी दूर एक अशी जागा आहे जिच्यावर कोणाचाच अधिकार नाही तेव्हा त्यांनी या जागेला देश बनवण्याचे विचारले.

 

काय आहे प्रकरण..
झाले असे की, 1991 साली यूगोस्लावियाच्या विघटनानंतर बाकी सात राज्यांची निर्मिती केली गेली. यादरम्यान असे अनेक सीमा क्षेत्र होते जे विवादीत झाले होते त्यांना नो मॅन्स लॅन्ड घोषित केले गेले. प्यॉत्र आणि त्याच्या काही मित्रांनी यातील एका जागेला देश बनवण्याचे ठरवले. 

 

कोणीही येऊन राहू शकते..
- प्यॉत्रचे म्हणणे आहे की या देशाचे दरवाजे प्रत्येक देशाच्या नागरीकासाठी खुले आहे. त्यांनी सांगितले की आमचा उद्देश असा देश बनवणे आहे ज्यात रंग, जाती, धर्म आणि राष्ट्रीयता यासारखा भेद असणार नाही. कोणीही येथे येऊन राहू शकतो विशेष म्हणजे कोणताही टॅक्स न देता.

 

पाच भाषांना आहे मान्यता...
- या देशात पाच भाषांना मान्यता देण्यात आली आहे. ज्यात चीनी भाषेचा समावेश आहे. येथील संविधान आता लिहीले जाणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक आयडी पेपर्सही तयार करण्यात येणार आहे. सध्यातही हा देश फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे आणि याच्या अस्तित्वाला कोणत्याही इंटरनॅशनल बॉडीने मान्यता दिलेली नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या देशाचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...