आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 इंचाच्या वस्तूला दगड समजत राहिला व्यक्ती, तो होता 26 लाख वर्ष जुन्या शार्कचा बॉडी पार्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्थ कॅरोलिनाच्या टॉप सेल बीचवर एक व्यक्तीला लाखो वर्ष जुनी वस्तू सापडल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे राहणारे डॅनी ब्लेंड काही दिवसांपूर्वी बीचवर फिरायला निघाले होते, या दरम्यान त्यांनी दृष्टी एका टोकदार चमकणाऱ्या वस्तूवर पडली. ब्लेंड यांनी एक सामान्य दगड समजून ती वस्तू जवळ ठेवून घेतली. त्यानंतर त्यांनी या वास्तूविषयी जवळपासच्या लोकांना विचारले, परंतु त्याविषयी कोणालाच काही माहिती नव्हते. थोड्या दिवसानंतर काही जाणकार लोकांनी या वस्तूचे सत्य सांगितल्यानंतर डॅनी यांचा त्यावर विश्वासच बसला नाही.


26 लाख वर्ष जुना दात होता तो...
- डॅनी यांनी ही वस्तू काही जाणकार लोकांकडे घेऊन गेले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी डॅनीला विचारले की, ही वस्तू त्यांना कुठे सापडली? त्या लोकांनी डॅनीला सांगितले की, हा एक सामान्य दगड नसून पाचीन काळातील सर्वात खतरनाक मॅगलाडोन नामक भीमकाय शार्क माशाचा दात आहे. अशाप्रकारचे शार्क मासे 26 लाख वर्षांपूर्वी होते. त्यांच्या दातांची लांबी 6 इंच होती.


अमेरिकेत उपलब्ध आहेत या शार्क माशाचे अवशेष 
- एक्सपर्ट्सने सांगितले की या भीमकाय शार्कचे अवशेष अमेरिकेतील एका संग्रहालयात उपलब्ध आहेत. या शार्कची लांबी जवळपास 60 फूट होती. याचे जबडे 11 हजार ते 18 हजार किलोपर्यंत बळ निर्माण करत होते. यावरून त्यांच्या दाताच्या मजबूतपणाचा अंदाज लावू शकता. एक्स्पर्ट्सने सांगितले की, या माशाचा दात एका जेसीबी मशीनच्या पंजापेक्षा 5 पट अधिक ताकदवान होता. एका रिपोर्टनुसार मॅगलाडोन शार्कच्या एक दाताची किंमत लाखोंच्या घरात असू शकते.

बातम्या आणखी आहेत...