आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे जगातील सर्वात मोठा कॅमेरा, याच्यासमोर ट्रकही दिसतात मुंगीएवढ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकेचा देश चिलीमध्ये जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला जात आहे. हा कॅमेरा एवढा भीमकाय आहे की, त्यासमोर मोठे-मोठे ट्रकही अगदी लहान दिसतात. हा कॅमेरा जगातील खास दुर्बीण Large Synoptic Survey Telescope ला पॉवर देईल. यातून अंतराळाचे असे खास फोटो घेतले जातील जे यापूर्वी कोणीही पाहिलेले नसतील. 


2015 पासून सुरू आहे काम 
चिलीमध्ये 2015 पासून या दुर्बीणवर काम सुरू आहे. 2022 पर्यंत ही पूर्णपणे तयार होईल. 


1500 स्क्रीनवर पाहता येईल इमेज 
- सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजेयाचे रेझोल्युशन. या कॅमेऱ्याला 3.2 गेगा पिक्सल (3200 मेगा पिक्सल) ची लेन्स असेल. त्याचा एक फोटो पाहण्यासाठी 1500 हाय डेफिनेशनच्या स्क्रीन लागतील. 
- Critical Decision 3 नावाचा हा कॅमेरा टेलिस्कोप अंतराळाच्या अनेक नवीन आकाशगंगा आणि नव्या ग्रहांच्या शोधासाठीही वापरता येईल.  


नुकताच समोर आला व्हिडिओ 
या प्रोजेक्टवर काम करणारे जॅक्स सेबॅग यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या महाकाय कॅमेऱ्याचे फोटो काढले आणि काही व्हिडिओ तयार करून शेअर केले आहेत. 


दररोज रात्री घेईल 800 फोटो 
हा कॅमेरा टेलिस्कोपसह दररोज रात्री सुमारे 800 हून अधिक फोटो घेईल. त्याद्वारे अंतराळात सुरू असलेल्या रियल टाईम हालाचालींची माहिती मिळेल. यातून क्लिक करण्यात आलेले फोटो अशा काही गोष्टी सांगतील ज्या अद्याप कधीही समोर आलेल्या नाहीत. अगदी अंतराळातील उपग्रहांनीही अद्याप ज्या गोष्टी दाखवलेल्या नाहीत, त्या या कॅमेऱ्याद्वारे पाहता येतील. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कॅमेऱ्याचे इनसाइड PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...