आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराही इमारत बाहेरुन दिसायला अगदी एखाद्या सामान्य इमारतीप्रमाणे दिसतेय. पण या इमारतीच्या आत जे चालतं, त्यामुळे ही इमारत जगभरात बदनाम झाली आहे. आम्ही बोलतोय ते हाँगकाँगच्या Fuji या इमारतीविषयी. ही इमारत वेश्यांमुळे जगभरात ओळखली जाते. या इमारतीत केवळ प्रॉस्टिट्यूट्स राहतात. येथील प्रत्येक फ्लोअरवर अनेक वेश्या वास्तव्याला असून येथे दर दिवशी लाखोंचा व्यवसाय चालतो.
वेश्या येथेच का आहेत वास्तव्याला..
- हाँगकाँगच्या कायद्यानुसार येथे वेश्या व्यवसाय लीगल आहे. पण येथे हे काम व्यापार किंवा ग्रुपमध्ये करता येत नाही. त्यामुळे येथे प्रत्येक महिलेचे स्वतःचे वेश्यालय (Single Brothel) आहे. येथील स्थानिक लोकांव्यतिरिक्त जगभरातील टुरिस्ट येथे येत असतात.
22 पैकी 18 फ्लोअरवर आहेत वेश्यालय
- या इमारतीच्या चार मजल्यांवर काही दुकाने आणि मिनी मॉल्स आहेत. तर इतर 18 मजल्यांवर सिंगल ब्रोथल्स आहेत. एका विदेशी पत्रकाराने काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या आत जाऊन रिपोर्टिंग केले होते आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. रिपोर्ट्सनुसार, या इमारतीतल वेगवेगळ्या देशांतून आलेल्या सुमारे 150 वेश्या वास्तव्याला आहेत.
असा होता आँखो देखा हाल..
- रिपोर्टरने लिहिले, मी आणि माझा सहकारी इमारतीच्या आत शिरताच आम्हाला बघण्यासाठी लिफ्टजवळ लोकांची रांग लागली होती. यामध्ये तरुण आणि काही वयस्कर व्यक्तींचा समावेश होता. आम्ही तेथेच जाताच लोक आश्चर्यचकित होऊन आम्हाला बघू लागले. आम्ही वरच्या मजल्यावर पोहोचलो, तेव्हा येथील कॉरिडोअर रंगीबेरंगी लाइट्सने सजले होते. शिवाय प्रत्येक फ्लोअरच्या काही फ्लॅट्सवर विविध भाषांचे साइन लावण्यात आले होते.
प्रत्येक घरात आहे एक वेश्या...
- येथे प्रत्येक घरात एक वेश्या आहे. त्यांच्या घरांच्या बाहेर साइन बोर्डवर वेलकम, प्रतीक्षा करा किंवा नॉट अव्हेलेबल असे साइन लावण्यात आले आहेत. यावरुन या घरात महिला उपलब्ध आहे, की नाही, याचा अंदाज ग्राहकाला येतो.
पुढील स्लाईड्सवर बघा, येथील इनसाइड फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.