आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 मध्ये व्हायरल झाले Wild Life चे हे फोटोज, जगभरातून केले जात आहेत पसंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करणे किती कठीण असते, हे फोटोज पाहून समजू शकते. जंगलांत हिंस्र श्वापदांच्या मध्ये असो वा समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांचे फोटोज असो, एखाद्या चॅलेंजपेक्षा कमी नसतात. नॅशनल जिओग्राफिक फोटो एडिटर एलिजाह वाकर यांनी काही असेच फोटोज आपल्या कलेक्शनमधून सादर केले आहेत, या फोटोजना जगभरातून पसंती मिळत आहे. आम्ही सांगत आहोत, अशाच फोटोजबाबत...


आफ्रिकन लंगूर 20 महिन्यांत एकदा बाळाला जन्म देते. ती आपल्या पिल्लांची देखभाल करण्यात नेहमी पुढे असते. कमीत कमी वर्षभर ती आपल्या पिल्लाला जवळ ठेवते. लंगूरचा हा फोटो या वर्षी मार्चमध्ये प्रकाशित झाला. नॉर्थ केनियाच्या रेटिटी एलिफंट सँक्चुअरीमधून पाणी पिणाऱ्या हत्तींचा फोटो घेण्यात आला आहे. वास्तवात हा फोटो वॉरियर्स व्हू वन्स फीयर्ड एलिफंट नाऊ प्रोटेक्ट देम मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. तिसऱ्या स्लाइडमध्ये देण्यात आलेला माशांचा हा फोटो तुबाटाहा रीफ्स नॅचरल पार्कमधून घेण्यात आला. या फोटोला हाऊ द फिलिपाइन्स कोरल हार्ट कीप्स बीटिंगमध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये पब्लिश करण्यात आले होते.

चौथ्या स्लाइडमध्ये दाखवण्यात आलेला फोटो सुलावासीमध्ये समुद्राच्या किनारी बसलेल्या वानराचा आहे. हा वानर याकी या नावाने ओळखले जाते. वैज्ञानिक या वानराच्या माध्यमातून मनुष्य स्वभावाला समजण्याचा प्रयत्न करत आहेत. पाचव्या स्लाइडमध्ये दाखवण्यात आलेला फोटो क्वेजालकोटलस नोरथ्रोपीचा आहे. याची लांबी उडणाऱ्या जीवांमध्ये सर्वात जास्त असते. कुवैतच्या मिनेसोटा स्टुडियोमध्ये याला पेंट करण्यात आले. शेवटच्या स्लाइडमध्ये दाखवण्यात आलेला फोटो 10 महिन्यांच्या पिल्लाचा आहे. हा फोटो ब्राझीलच्या पंतनल परिसरातून टिपण्यात आला आहे. हा जगातील सर्वात मोठ्या ट्रॉपिकल वेटलँडचा आहे. हा फोटो याच महिन्यात इनसाइड द हिडन वर्ल्ड ऑफ जगुआरमध्ये प्रकाशित करण्यात आला.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, वाइल्ड लाइफचे प्रसिद्ध फोटोज...

बातम्या आणखी आहेत...