आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना मारुन त्यांचा मेंदु खाणारी गँगचे सत्य, व्हॉट्सअप मॅसेजवर फिरतेय अशी अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हट के - आंध्र प्रदेश आणि तामिळनाजू येथे अनेक ठिकाणी एका व्हॉट्सअप मॅसेजने खळबळ उडवून दिली आहे. यात असा दावा केला गेला आहे की बिहार आणि राजस्थान या राज्यांत एक गँग मुलांचे अपहरण करुन त्यांचा मेंदु खाते. व्हॉट्सअपवर असा मॅसेज देण्यात आला आहे   की, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे ज्यांच्याजवळ  चाकु आणि ब्लेड यांसारखे हत्यार मिळाले आहेत. ही गँग सावळ्या रंगाच्या मुलांना टार्गेट करते आणि त्यांना मारुन खाते. जाणून घेऊया व्हायरल मॅसेजची सत्यता..

 

- तेलंगाना येखे एका गावात राहणाऱ्या महिलेने सांगितले की अशा बातम्यांमुळे विश्वास करावा की नाही हेच कळत नाही.व्हॉट्सअपवर आलेल्या मॅसेजेसने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. 

असे मॅसेज व्हायरल झाल्यामुळे बाहेरील कोणीही गावात आल्यावर त्याच्यावर लोक अॅटॅक करत आहेत. मागील काही दिवसांत एका मुलाला यासाठी पकडले गेले की कारण तो तेलुगुमध्ये उत्तर देऊ शकत नव्हता. यानंतर त्याच्या बॅगमधून ब्लेड निघाले आणि त्याला मग नंतर पोलिसांकडे देण्यात आले.

 

पोलिसांनी ही केवळ एक अफवा असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की व्हॉट्सअपवर अशा प्रकारे मॅसेज पाठवून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवण्यात आले आहे आणि लोकांनी याकडे लक्ष देऊ नये असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...