Home | Khabrein Jara Hat Ke | Weather Uncovers Secret Buried Beneath Sand For 7,000 YEARS

7000 वर्षांनी समोर आले तलावात लपलेले रहस्य, एका वादळानंतर समोर आले विचित्र सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 12, 2018, 12:30 AM IST

ब्रिटनमध्ये अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे एका कलावात लपलेले 7000 वर्षापूर्वीचे

 • Weather Uncovers Secret Buried Beneath Sand For 7,000 YEARS

  ब्रिटनमध्ये अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे एका कलावात लपलेले 7000 वर्षापूर्वीचे रहस्य समोर आले आहे. क्लीवलँड शहरातील या तलावामधून पाणी कमी झाल्यानंतर आतमध्ये चित्रविचित्र गोष्टी दिसल्या. जेव्हा या गोष्टी काय आहेत ते पाहावयास गेले तेव्हा सर्वचजण हैराण झाले. हे 7000 वर्षापूर्वीचे वुडलँड जंगल होते ज्याबद्दल आतापर्यंत सर्वांनी किस्सांमध्ये ऐकले होते. याला 'बीस्ट ऑफ ईस्ट' नाव दिले गेले आहे. काय आहे जंगलाची ही कथा..

  मीडिया रिोपर्टसनुसार, तलावात रेती आणि पाणी काढल्यानंतर जमीनीवर हजारो वर्षापूर्वीचे अवशेष दिसले. हे जवळपास 400 मीटर क्षेत्रामध्ये दिसत होते. असे म्हटले जाते की पूर्ण तलाव आणि शहरांहून मोठे हे जंगल होते ज्याचा खूप सारा हिस्सा डुबलेला होता.

  40 वर्षाअगोदरही दिसला होता..
  - येथे गेल्या अनेक वर्षापासून बोटमॅनचे काम करणाऱ्या गॅरी वॉने सांगितले की, याचा काही भाग 40 वर्षाअगोदरही दिसला होता पण त्याचे फोटो काढणे तेव्हा शक्य नव्हते. गॅरीने सांगितले की मी 10 वर्षांचा होतो तेव्हा आम्ही इथे शाळेच्या सहलीसाठी आलो होतो आणि आता इतक्या वर्षानंतर याला पुन्हा पाहणे फारच आनंददायी आहे.

  147 वर्षाअगोदर काढण्यात आले होते अवशेष...
  - या तलावाच्या खाली जंगल असल्याचे सर्वात पहिले 1871 साली समोर आले होते जेव्हा येथून हजारोंच्या संख्येने वाईल्ड बोर आणि हरणांच्या हड्ड्या मिळाल्या होत्या. यानंतर या जंगलचा दुसरा हिस्सा कधीच दिसला नाही.

  कधी असतील हे जंगल..
  - एक्सपर्टने सांगितले की, हे जंगल 7 हजार वर्षे जूने आहेत आणि आदिमानवांचे या जंगलात वास्तव्य असल्याचे नाकारता येत नाही.

  पुढच्या स्लाईडवर पाहा, तलावाच्या खाली मिळालेल्या जंगलाचे काही खास Photos..

 • Weather Uncovers Secret Buried Beneath Sand For 7,000 YEARS
 • Weather Uncovers Secret Buried Beneath Sand For 7,000 YEARS
 • Weather Uncovers Secret Buried Beneath Sand For 7,000 YEARS
 • Weather Uncovers Secret Buried Beneath Sand For 7,000 YEARS

Trending