आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता जीममध्ये मुलींच्या आसपास भटकणार नाही खोडकर मुले, मॉडेलने सांगितलेली ही ट्रिक वापरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याचदा जीममध्ये मुली आजुबाजुच्या मुलांमुळे व्यायाम करताना कम्फर्टेबल नसतात. त्याचे कारण असते की व्यायाम करताना आजुबाजुचे लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना फुकटचे ज्ञान देण्याचाही प्रयत्न करतात. पण आता ब्रिटनच्या एका महिलेने अशी ट्रिक सांगितली आहे की, ज्यामुळे मुलींच्या आजुबाजू कोणताही मुलगा भटकण्याचा प्रयत्न करणार नाही.

 

Olivia Cole नावाच्या महिलेने काही पर्सनल एक्सपिरीअंस शेअर करताना सांगितले आहे की कशाप्रकारे ती जीममध्ये तिच्याशी बोलायला येणाऱ्या मुलांमुळे परेशान होते पण एक दिवस तिने अशी ट्रीक वापरली की सर्वकाही सुरळीत झाले. 

 

ओलिवियाने सांगितले की, जो मुलगा माझ्याशी बोलायला आला तेव्हा मी त्याला बोलली की तु इथे यायला नको. मी आताच पादली आहे त्यामुळे तुला घाण वास येऊ शकतो. हे ऐकताच तो मुलगा तेथून निघून गेला आणि नंतर कधीच माझ्याशी बोलायला आला नाही.

 

ओलिवियाच्या शेजारी जीम करत असलेली मुलीने विचारले की तु खरच फार्ट केले आहे का त्यावर ओलिवीयाने सांगितले ही केवळ मुलांना पळवण्याची ट्रीक होती.

 

यासोबतच ओलिवियाने अजून एक ट्रिक सांगितली, अनेकदा ती जीममध्ये मुद्दाम खोकण्याचा प्रयत्न करते आणि कफ काढण्याचा प्रयत्न करते. हे ऐकून सर्व मुले तेथून निघून जातात. 

 

सोशल मीडियावर व्हायरल झाली ट्रीक..
ओलिवियाची ही ट्रिक सोशल मीडियावर व्हायरल झाली काहींनी याचे कौतुक केले तर काहींनी याला विचित्र सांगितले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लोकांनी काय सांगितले...