आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अशी जीन्स परिधान करून निघाली तरुणी, पाहतच राहिले रस्त्यावरील सगळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - रस्त्यांवर अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले की लोक पाहतच राहिले. याठिकाणी 23 वर्षांची एक मॉडेल जेव्हा रस्त्यावर निघाली तेव्हा तिची जीन्स चर्चेचा विषय बनली होती. मॉडेलने अशी जीन्स परिधान केली होती, जी गुडघ्याच्यावर फाटलेली होती. त्यातून इनविअर एक्पोज होत होते. 


लोक म्हणाले वेडी 
- ब्रिटनमध्ये राहणारी 23 वर्षीय मॉडेल अॅनाबेल मिजेल एक नव्या प्रकारची जीन्स प्रमोट करत होती. ही जीन्स Asos नावाच्या कंपनीने तयार केली आहे. लंडन ब्रिजपासून अनेक बस स्टॉप आणि पब्सपर्यंत या मॉडेलने ही जीन्स परिधान करून प्रवास केला आणि लोकांच्या गमतीशीर प्रतिक्रिया पाहिल्या. अॅनाबेलच्या मते काही लोक तिला वेडीही म्हणाले. 

 

एकटक पाहत होते लोक 
- अॅनाबेलने तिचा अनुभव सांगताना लिहिले की, मी इतर दिवसांप्रमाणे कामाला निघाले होते. आधी मी बस स्टॉपवर थांबले आणि लोकांनी मला एकटक पाहायला सुरुवात केली. त्यानंतर मी एक टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला. मला अगदी झटकन टॅक्सी मिळाली. ड्रायव्हर बराच वेळ मला टक लावून पाहत होता. 
- त्यानंतर अॅनाबेल एका स्ट्रीट पबमध्ये गेली. त्याठिकाणी कोणीतरी एलियन पाहिल्यासारखे लोक तिला पाहत होते. अॅनाबेल म्हणाली, हा प्रवास मजेशीर होता. काही लोक हसतही होते. 


फोटो घेण्याचा प्रयत्न 
एका व्यक्तीने अॅनाबेलचा फोटो घेण्याचाही प्रयत्न केला. तिने सांगितले की, तो माझ्या जवळ येऊन उभी राहीला आणि मोबाईलने फोटो घेण्याचा प्रयत्न करू लागला. सोशल मीडियावर या खास काऊबॉय जीन्सची चर्चा आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जेव्हा या मॉडेलचे विचित्र जीन्समधील काही PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...