आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा26 डिसेंबर हा दिवस सुनामीच्या कटु आठवणी जागी करतो. सुनामी वादळाने लाखो लोकांना बेघर केले होते. ज्यांनी सुनामी पाहिली होती, ज्यांनी आपल्या आप्तांना गमावले होते, त्यांच्या मनात आजही आपल्या कुटुंबातील लोकांना गमावण्याचे दुःख आहे. ते भयावह वादळ इंडोनेशियाच्या 44 वर्षांच्या फौजियानेही पाहिले होते. फौजिया सांगत आहे आखों देखा हाल....
असे वाटत होते जणू साक्षात मृत्यू समोरुन येत आहे.
- इंडोनेशियातील बांदा येथे राहाणारी फौजिया तिच्या पाच मुलांसह घरात होती. तिचे पती मार्केटमध्ये गेले होते. फौजिया सांगते, की मला थोडाही अंदाज नव्हता की बाहेर का झाले आहे. मी माझ्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन समुद्राकडे पाहिले तर मला काळ्या लाटा उठत असल्याचे दिसले.
- सुरुवातीला मला कळाले नाही की ते पाणी आहे की तेल. परंतू तुफान एवढे वेगवान होते की मला पुढच्याच क्षणाला या वादळाची भयावहता कळाली. मला असे वाटले की मृत्यू माझ्यासमोर उभा आहे.
- मला असे वाटले की मी आणि माझी मुलं आता मरणार आहोत. तुफान पाहाताच माझा मुलगा छतावर चढला आणि त्याने छताला एक मोठे छिद्रे केले. यानंतर एका बोटीने मला आणि माझ्या मुलांना घरातून बाहेर काढले.
सर्वत्र मृतदेह तरंगत होते
- मला त्यावेळी आणखी एक चिंता होती, माझे पॅरेंट्स आणि पती कुठे असतील याची. तेव्हा वादळाने रौद्ररुप धारण केले होते, मी फक्त एवढीच प्रार्थना करत होते की आम्ही सर्व जिवंत वाचलो पाहिजे.
- मी आणि माझी मुलं तर सुनामीतून वाचलो मात्र माझे पॅरेंट्स आणि पती त्यातून वाचू शकले नाही. सुनामी त्यांना घेऊन गेली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा सुनामीचे रौद्ररुप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.