आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google Goats : गुगलमध्ये काम करतात 200 बकऱ्या, कंपनी त्यांना पगारही देते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल कंपनीमध्ये माणसांनंतर तुम्ही मशीन्सनाही काम करताना पाहिले असेल. पण याठिकाणी बकऱ्याही काम करतात हे तुम्हाला माहिती आहे का.. हो तुम्ही वाचतायत हे अगदी बरोबर आहे. गुगलमध्ये तब्बल 200 बकऱ्या काम करतात आणि गुगलकडून त्यामोबदल्यात त्यांना सॅलरीही दिली जाते. 


गूगलने सर्वात आधी 2009 मध्ये याची सुरुवात केली होती. त्यावेळी कंपनीने 200 बकऱ्या कामावर ठेवल्या होत्या. त्या गूगलप्लेक्स ऑफिसमध्ये तयार करण्यात आलेल्या पार्कमध्ये असलेले गवत चारा म्हणून चरतील आणि त्यामुळे गवत ट्रिम होत राहील. गुगलच्या मते, गवत कापण्याच्या मशीनमुळे ध्वनी, वायू प्रदूषण होते. तसेच उर्जाही नष्ट होते. त्यामुळेच कंपनी बकऱ्यांना नोकरीवर ठेवते. गुगलने स्वतः याबाबत माहिती दिलेली आहे. 

 

याहूने केली होती सुरुवात..
आठवड्यातून एकदा या 200 बकऱ्या गुगलच्या मोठ्या लॉनवर सोडल्या जातात. काही तासांतच त्या सर्व लॉनवरील गवत खाऊन टाकतात. पण बकऱ्यांनी केवळ गवतच खावे यासाठी त्यांच्या गुराख्यांकरवी त्यांना खस ट्रेनिंगही दिले जाते. प्रत्येक बकरीचा पगारही दिला जातो. तो संबंधित एजन्सीमध्ये जमा होतो. त्याशिवाय बकऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही केली जाते. कॅलिफोर्नियानंतर आता गुगलच्या अनेक ऑफिसेसमध्ये या 'गूगल गोट्स' काम करतात. यापूर्वी 2007 मध्ये याहूनेही त्यांच्या लॉनचे गवत कापण्यासाठी बकऱ्या ठेवल्या होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...