आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला जिवंत सिध्द करण्यासाठी कोर्टात पोहोचला 'डेड मॅन', जजने केला आश्यर्यकारक खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोमानियाच्या कोर्टाने एका 63 वर्षीय व्यक्तीविषयी एक खुलासा केलाय, जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. खरेतर येथे राहणा-या कोन्स्टेंटीन रिलू नावाच्या व्यक्तीला अनेक वर्षांपुर्वी मृत घोषित केले होते. स्वतःला जिवंत सिध्द करण्यासाठी कोन्स्टेंटीन जेव्हा स्वतः कोर्टात पोहोचले तेव्हा त्यांना कोर्टाने जिवंत मानण्यास नकार दिला. त्यांना सांगण्यात आले की, ते कायदेशीररित्या मृतच राहतील. 


असे का झाले...
कोन्स्टेंटीन 1992 मध्ये नोकरीच्या शोधात तुर्कीमध्ये गेले होते. यानंतर ते 1999 मध्ये आपल्या देशात परतले. परंतू 1999 नंतर त्यांचा घरापासून संपर्क तुटला. वर्षांनुवर्ष नवरा परत न आल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना मृत मानले. त्यांच्या पत्नीला वाटले की, तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामध्ये नव-याचा मृत्यू झालाय. 2003 मध्ये कोन्स्टेंटीनच्या पत्नीने त्याचे डेथ सर्टिफिकेटही बनवून घेतले.

 

परत आले कोन्स्टेंटीन
- एकदा अचानक कोन्स्टेंटीनला तुर्की पोलिसांनी अटक केली. कारण त्यांचे डॉक्यूमेंट एक्सपायर झाले होते. तिथून त्यांना परत रोमानियाला पाठवण्यात आले. त्यांनी विचार केला की, ते आपल्या देशातून पासपोर्ट रिन्यू करुन पुन्हा तुर्कीत येतील. परंतू इमिग्रेशन डिपार्टमेंटने त्यांना पुन्हा पकडले आणि त्यांना सांगितले की, त्या 2003 मध्ये मृत्यू झालाय. हे सर्व एकून त्यांना धक्का बसला. कोन्स्टेंटीनचे मानने आहे की, त्यांच्या बायकोने गाईमध्ये त्यांना मृत घोषित करुन डेथ सर्टिफिकेट घेतले. कारण तिला दूसरे लग्न करायचे होते.


कोर्ट म्हणाले आता खुप उशीर झालाय
- कोन्टेंटीसनला तुर्कीमध्ये जाऊन एक कंपनी सुरु करायची होती. परंतू या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे त्यांच्याकडे काहीच ओळख उरलेली नाही. कोर्ट म्हणाले की, 10 वर्ष हा खुप मोटा काळ आहे. स्वतःला जिवंत सिध्द करण्यासाठी खुप उशीर झाला आहे. आता त्यांना मृत मानले जाईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मृत घोषित केलेल्या व्यक्तीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...