आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Horrifying Footage : Man Captures His Own Death While Performing Stunt On A Rooftop

कॅमे-यात कैद केला आपलाच मृत्‍यू, घेत होता थरकाप उडवणारा सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्‍या गगनचुंबी इमारतींवर चढून सेल्‍फी घेणा-या 26 वर्षीय Wu Yongning ने आपल्‍याच मृत्‍यूचा व्हिडिओ बनवला आहे. वू नेहमी उंचच इमारतींवर चढून पाहणा-याचा थरकाप उडेल अशा पद्धतीच्‍या सेल्‍फी घ्‍यायचा. मात्र त्‍याचा हाच शौक त्‍याच्‍या मृत्‍यूचे कारण बनले आहे. नुकताच त्‍याच्‍या मृत्‍यूचा एक व्हिडिओ व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये वू 62 मजली इमारत Huayuan International Centreवर चढून स्‍टंट करताना दिसत आहे. यादरम्‍यान तो स्‍वत:चा व्हिडिओ बनवत होता.


इतकी उंच आहे ही इमारत
- ज्‍या इमारतीवरुन खाली पडून Wu Yongningचा मृत्‍यू झाला. ती इमारत जपळपास 900 फुट उंच आहे. ही चीनमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे.

 

1.5 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ
- पोलिसांना त्‍याच्‍या मृत्‍यूचा हा व्हिडिओ त्‍याच्‍याच कॅमे-याद्वारे मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, कॅमेरा स्‍टँडला लावून तो हा स्‍टंट करत होता तेव्‍हाच ही दुर्घटना झाली. एक कॅमेरा त्‍याच्‍याजवळ होता. ज्‍याद्वारे तो सेल्‍फी घेण्‍याचा प्रयत्‍न करत होता. सोशल मिडीयावर आतापर्यंत 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.


येथेच करणार होता प्रेयसीला प्रपोझ
- Wu Yongningच्‍या मित्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार याच इमारतींहून तो आपल्‍या मैत्रिणीला लग्‍नासाठी प्रपोझ करणार होता. मात्र त्‍याचपूर्वीच या इमारतींहून खाली पडून त्‍याचा मृत्‍यू झाला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...