आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॅरीलंड- अमेरिकेतील मॅरीलंडमध्ये राहणारे जोसेफ आणि कतरीना असूनही 'ती' घटना विसरले नाहीत. गेल्या वर्षी या दाम्पत्याच्या बाळाने जन्म घेतल्यानंतर काही मिनिटांतच निधन झाले होते. प्रसूती वेळे आधीच झाल्याने बाळ दिसायला अत्यंत विलक्षण होते. जन्मानंतर अवघ्या 11 मिनिटांत त्याने प्राण सोडले होते. या घटनेला वर्ष झाले आहे. कतरीनाने आपल्या कन्येच्या आठवणीत एक पत्र लिहिले आहे.
सक्तीने करावी लागली प्री-मॅच्योर डिलिव्हरी
- ही घटना ऑगस्ट 2017 मधील आहे. 19 आठवड्यांचा (जवळपास 5 महिने) गर्भ पोटात असतानाच कतरीनाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. कतरीनाची पहिली मुलगी कॅरोलिन ही चार वर्षाची आहे.
- प्री-मॅच्योर डिलिव्हरीनंतर कतरीनाने एक मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव एप्रिल रे ठेवण्यात आले होते. परंतु तिने जन्मानंतर अवघ्या 11 मिनिटांतच जग सोडले. आईच्या कुशीतच तिने अखेरचा श्वास घेतला होता. एप्रिल रेचा जन्म 8 ऑगस्ट 2017 रोजी रात्री 11 वाजून 22 मिनिटाला झाला आणि त्याच रात्री 11 वाजून 34 मिनिटाला तिचे निधन झाले.
- कतरीना आणि जोसेफने मजबूरीत निर्धारित वेळेआधी डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर्सने या दाम्पत्याला सांगितले होते की, जन्माला येणार्या बाळाला अत्यंत धोकादायक ट्रायसोमी-13 (पटायु सिंड्रोम) आजार झाला आहे. होणारे बाळ हे मानसिक आणि शारीरिक व्यंगासह जन्माला येईल. सोबतच कतरीनाच्या जीवालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे कतरीना आणि जोसेफने प्री-मॅच्योर डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता.
मुलीच्या आठवणीत लिहिले पत्र...
- एप्रिल रेच्या मृत्यूने कतरीनाला प्रचंड दु:ख झाले होते. या दु:खातून ती अजूनही परिपूर्ण बाहेर निघालेली नाही. तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, 'मी एक मुलीला जन्म दिला होता. परंतु मी तिला घरी आणू शकली नाही. हे परमेश्वरा, माझ्यासाठी हा किस्सा लिहिणे अत्यंत वेदनादायी आहे. एप्रिल काही वेळेसाठी माझ्या आयुष्यात आली होती. परंतु तितक्या वेळात तिने मला भरपूर आनंद दिला.'
- कतरीनाने सांगितले की, 'छोट्याशा परीला भेटून मी खूप खूश होते. ती माझ्या कुशीत होती. मी तिला एकही अश्रु न ढाळता निरोप दिला. ती अद्भुत आणि संपूर्ण होती.' एप्रिल गेल्यानंतर माझी स्तनपान करण्याची इच्छा होती परंतु माझ्याकडे बाळ नव्हते. हे दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण होते.'
- या घटनेनंतर वर्षभरातच माजी इंजिनिअर आणि केमेस्ट्रीची प्राध्यापक कतरीना पुन्हा एकदा गरोदर आहे. तिला जानेवारीमध्ये मुलगा होणार आहे. त्याचे नाव ती विलियम असे ठेवणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.