आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे शापित पेंटिंग, घरात लावल्याने लागते आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क - तुम्ही कधी विचारही केला नसेल की एखादे चित्र अपघातांना जबाबदार असू शकते. कदाचित नाहीच. परंतु, द क्राइंग बॉय नावाच्या एका पेंटिंगवर असे आरोप लागलेले आहेत की, ती जिथे लावली जाते तेथे आग लागते. या पेंटिंगला बनवणारा कोणी साधारण कलाकार नव्हता, तर इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट जियोवनी ब्रागोलिन आहेत. 

 

1985 मध्ये बनवली होती पेंटिंग...
जियोवनी ब्रागोलिन यांनी 1985 मध्ये एका रडणाऱ्या बालकाचे चित्र बनवले. याच नाव द क्राइंग बॉय होते. ही ब्रागोलिन यांच्या काही निवडक पेंटिंग्जपैकी एक आहे. जेव्हा द क्राइंग ब्वॉय ची ही पेंटिंग खूप पसंत केली जाऊ लागली तेव्हा ब्रागोलिन यांनी याची पूर्ण सिरीज तयार केली. पेंटिंग एवढी प्रसिद्ध झाली की, पेंटिंगच्या 50 हजार कॉपीज तयार करण्यात आल्या. काळाबरोबर ब्रागोलिन यांना या पेंटिंगने प्रसिद्ध केले, परंतु हेही तेवढेच सत्य आहे की, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या पेंटिंगमुळे बदनामीही त्यांच्या वाट्याला आली.

 

फायर फायटर्सची आंखों-देखी
असे म्हणतात की, ज्या लोकांनी या पेंटिंगला खरेदी करून आपल्या घरातील भिंतींवर सजवले, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. घरांमध्ये अपघातांचे शुक्लकाष्ठ सुरू झाले. इटलीच्या एका टॅब्लॉइड द सनच्या रिपोर्टनुसार, अनेक फायर-फायटर्सनी या बाबीचा खुलासा केला होता. ते म्हणाले की, आम्ही तब्बल 15 घरांना आग लागल्याचे कळल्यावर आमच्या पथकासह गेलो. आम्ही ज्या घरातील आग विझवित होतो, तेथे द क्राइंग बॉय पेंटिंग आढळायची. त्यांचे म्हणणे होते की, घरातील सर्व चीजवस्तू जळालेल्या होत्या, परंतु ही पेंटिंग तेवढीच सहीसलामत आढळायची. 

 

घरांमध्ये पेंटिंग ठेवणे झाले बंद
अपघातांच्या बातम्या येऊ लागल्याने लोकांनी पेंटिंग घरांमध्ये ठेवणे बंद केले. नंतर शेकडोंच्या संख्येने या पेंटिंगच्या कॉपीज जाळण्यात आल्या. यानंतर अपघातांची संख्याही घटली. झालं. लोकांनी समजूत करून घेतली की, ती पेंटिंग खरोखरच शापित होती. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आग लागूनही शाबूत राहिलेल्या या पेंटिंगचे फोटोज व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...