आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कशीत वाघ-सिंहाने केला घोड्यावर हल्ला, जी मुठीत धरून दोघे वाचवत होते त्याचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील एका सर्कशीतील अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. याठिकाणी सर्कशीत सरावादरम्यान एक वाघ आणि एक सिंह अचानक चिडले आणि त्यांनी रिंगमध्ये असलेल्या एका घोड्यावर हल्ला चढवला. पण त्यावेळी सर्कशीतील क्रूच्या दोन सदस्यांनी जीवाची बाजी लावत घोड्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. 


समोर आला व्हिडिओ.. 
- सिंह आणि वाघाच्या घोड्यावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ बाहेर उभ्या असलेल्या एखा व्यक्तीने तयार केला आहे. Taiyang Circus चे मिस्टर सू म्हणाले, हा व्हिडिओ डिसेंबरच्या अखेरच्या दिवसांतील आहे. त्यावेळी आम्ही नव्या वर्षाच्या एका शोसाठी प्रॅक्टीस करत होतो. 
- मिस्टर सू पुढे म्हणाले, यात पार काही विशेष नाही. वाघ आणि सिंहांचा मूळ स्वभाव का क्रूर असतो. घोडा मात्र अगदी सरळमार्गी असतो. अशा परिस्थितीची आम्हाला अनेकदा सामना करावा लागत असतो. क्रू मेंबर अनेकदा जीव मुठीत धरून प्राण्यांचे जीव वाचवत असतात. 


कसे वाचवले घोड्याला 
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हल्ला केल्यानंतर सिंह घोड्याच्या शरिराला लटकून होता तर बाङ मागे पळत हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचदरम्यान रिंगच्या आत असलेल्या दोन ट्रेनर्सने त्यांच्या छडीने मारून वाघ आणि सिंहाला हटवण्याचा प्रयत्न केला. वाघ मागे हटलाही पण सिंह घोड्याला सोडत नव्हता. घोड्यानेही हार मानली नाही, तो सिंहाला ओढत राहिला. अनेक प्रयत्नांनंतर घोडा वाघ आणि सिंहाच्या कचाट्यातून बचावला. काही ठिकाणी जखमी झालेला घोडा आता पूर्णपणे ठिक आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे घडले हे सर्व... 

बातम्या आणखी आहेत...