आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चमधील उत्‍खननात आढळला 500 वर्षे जुना मुलाचा सापळा, समोर आले धक्‍कादायक सत्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीतील Naplesमध्‍ये वैज्ञानिकांना जमीनीमध्‍ये एक 500 वर्षे जूना सापळा सापडला आहे. यातून अनेक आश्‍चर्यचकित गोष्‍टी समोर आल्‍या आहेत. Saint Domenico Maggiore नावाच्‍या चर्चमध्‍ये सापडलेल्‍या या सापळ्याचा वैज्ञानिक कसून अभ्‍यास करत आहे. हा एक मुलाचा सापळा आहे. पहिले मानले जात होते की, या मुलाचा मृत्‍यू चिकन पॉक्‍सने झाला असावा. मात्र नंतर जे सत्‍य समोर आले त्‍यांने सर्वांनाच धक्‍का बसला.


डीएनमुळे समोर आले सत्‍य
- पहिले या सापळ्याची साधी चाचणी करण्‍यात आली होती. तेव्‍हा मानले जात होते की, या मुलाचा मृत्‍यू एखाद्या व्‍हायरसमुळे किंचा चिकन पॉक्‍ससारख्‍या आजारामुळे झालेला असावा. मात्र नंतर McMaster University च्‍या वैज्ञानिकांनी सापळ्याची हाडे आणि इतर सँपलची डीएनए चाचणी केली तेव्‍हा धक्‍कादायक सत्‍य समोर आले.
- डीएनएमुळे समोर आले की, मुलाचा मृत्‍यू चिकन पॉक्‍समुळे नव्‍हे तर HBV म्‍हणजेच हेपेटायटिस-बी या व्‍हायरसमुळे झाली आहे.


500 वर्षांपासून बदलला नाही व्‍हायरस
- या रिसर्चचा सर्वात आश्‍चर्यचकीत करणारा दावा होता हेपेटायटिस-बी बद्दल. वैज्ञानिकांचे म्‍हणणे आहे की, व्‍हायरस वेगाने स्‍वत:मध्‍ये बदल घडवत असतात. मात्र 500 वर्षांनंतरही हेपेटासटिस-बी व्‍हायरसवर कोणताच विशेष असा बदल झाला नाही.


या शोधामुळे होणार हे फायदे
- वैज्ञानिकांच्‍या मते इतक्‍या वर्षांनंतरही व्‍हायरसमध्‍ये बदल न होणे हा चिंतेचा विषय आहे. अशा व्‍हायरसविरुद्ध लढणे अत्‍यंत कठिण असते. संशोधकांचे म्‍हणणे आहे की, आपल्‍याला आता पुरातन काळातील अशाच व्‍हायरसचा शोध घ्‍यावा लागेल.  ज्‍याद्वारे त्‍यांच्‍याशी कसे लढायचे, हे आपल्‍याला समजेल.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, 500 वर्षे जुन्‍या या सापळ्याचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...