आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 वर्षांपूर्वी रुग्णांवर असे व्हायचे उपचार, पाहा मेडिकल इतिहासातील Rare 12 Pix

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या छायाचित्रात अमेरिकेचे प्रसिद्ध डॉक्टर लेविस अलबर्ट सायरे (1820-1900) एका रुग्णाचा उपचार करतानाचे छायाचित्र आहे. 19 व्या शतकातील प्रमुख ऑर्थोपेडिक सर्जनमध्ये त्यांची गणना होते. - Divya Marathi
या छायाचित्रात अमेरिकेचे प्रसिद्ध डॉक्टर लेविस अलबर्ट सायरे (1820-1900) एका रुग्णाचा उपचार करतानाचे छायाचित्र आहे. 19 व्या शतकातील प्रमुख ऑर्थोपेडिक सर्जनमध्ये त्यांची गणना होते.

आज मेडिकल सायन्सने खूप प्रगती केली आहे. मानवी शरीररचनेविषयीची इत्यंभूत माहिती डॉक्टरांनी प्राप्त केली आहे. अनेक दुर्धर आजारांवर आज औषधोपचार केला जातो. मात्र शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती काही वेगळी होती. तेव्हा उपचारांसाठी अनेकदा विचित्र पद्धतींचा अवलंब केला जायचा. त्याकाळात रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागायचा.

 

आज आम्ही मेडिकल इतिहासातील काही दुर्मिळ छायाचित्रे आपल्या वाचकांना दाखवणार आहोत. पहिल्या छायाचित्रात अमेरिकेचे प्रसिद्ध डॉक्टर लेविस अलबर्ट सायरे (1820-1900) रुग्णावर उपचार करताना दिसत आहेत. 19 व्या शतकातील प्रमुख आर्थोपेडिक सर्जनमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी पाठीच्या कणासंदर्भातील आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णाला सरळ लटकवण्याची पद्धत शोधून काढली होती. आजच्या काळात निश्चितच या उपचार पद्धतीवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र त्याकाळी अशा पद्धतीनेच या आजारावर उपचार केले जायचे. डॉक्टर लेविस खूप प्रतिष्ठित होते आणि 1880 मध्ये ते अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मेडिकल इतिहासातील अशीच दुर्मिळ छायाचित्रे....

बातम्या आणखी आहेत...