आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे आहे जगातील सगळ्यात मोठा अंडर वॉटर बोगदा, हे आहे खास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सगळ्यात लांब अंडर वॉटर बोगदा मेक्सिकोच्या पूर्व भागात सापडला आहे. या बोगद्याची लांबी 347 किलोमीटर आहे. हा बोगदा ग्रैन एक्युफेरो माया नावाच्या अभियानातंर्गत शोधण्यात आला. 

 

 

काय आहे या बोगद्याचे नाव
- हा बोगदा 12 हजार वर्ष जुना आहे. या बोगद्याचे नाव सैक एकटन असे ठेवण्यात आले आहे. या बोगद्यामुळे माया संस्कृतीची माहिती मिळू शकते.  

- येथे एक कब्र सुध्दा भेटली आहे. जीएएम डायरेक्टर आणि आर्कोलॉजिस्ट गुईलेमों एंडा यांनी सांगितले की, या बोगद्यात तीर्थस्थळे, अनेक जुन्या वस्त्या आणि अस्थी मिळू शकतात. येथे माया संस्कृतीच्या काळातील एक पुरातन मंदिरही असल्याचे सांगण्यात येते. 

 

 

काय आहे माया संस्कृती
- अमेरिकेतील प्राचीन माया संस्कृती ही ग्वाटेमाला, मेक्सिको, होंडुरास आणि यूकाटन द्विपावर होती. माया संस्कृती ही मेक्सिकोची एक महत्वपूर्ण सभ्यता होती. आतापर्यंत माया संस्कृतीत राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानाबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही. या संस्कृतीत शासक पुरुष असत, कधीतरी महिलाही शासक असत. राजा सिंहासनावर बसत असताना देवतांना प्रसन्न करण्यासाठी नरबळी दिला जात होता. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...