आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच ह्रदयाने जुळलेले होते हे जुळे, 7 तासांच्‍या ऑपरेशननंतर झाले वेगळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्‍या टेक्‍सासमध्‍य डॉक्‍टरांनी एक अनोखे ऑपरेशन केले आहे. एका वर्षांपूर्वी येथे जुळ्या मुलांना आणले गेले होते. त्‍यांची ह्रदय इतकेच नव्‍हे तर पोटांचे भागही जुळलेले होते. डॉक्‍टरांनी 7 तासांच्‍या अथक प्रयत्‍नानंतर त्‍यांना वेगळे केले होते. सांगितले जाते की, 75 सर्जननी हे ऑपरेशन केले हाते.

 

असा झाला होता जन्‍म
- रिचडर्स परिवारामध्‍ये 29 डिसेंबर, 2016 रोजी या जुळ्याचा जन्‍म झाला होता. एना आणि होप असे त्‍यांचे नाव आहे. जन्‍मापासून दोघांनाही एकच ह्रदय होते व ते एकमेकांशी जोडलेले होते.


जन्‍म होण्‍यापूर्वी झाली होती ऑपरेशनची तयारी
- या जुळ्यांच्‍या ऑपरेशनची तयारी त्‍यांचा जन्‍म होण्‍यापूर्वी झाली होती. ते आईच्‍या पोटात असतानाच डॉक्‍टर सर्जरीची तयारी करत होते. ऑपरेशनमधील एका सिनीयर सर्जनने सांगितले आहे की, हे ऑपरेशन फार कठीण होते. आमच्‍या संपुर्ण टीमने चांगली मेहनत घेतल्‍यानेच आम्‍ही यशस्‍वी होऊ शकलो.

 

आता करत आहे रिकव्‍हरी
- ऑपरेशनंतर दोन्‍ही मुल हॉस्पिटलमध्‍ये डॉक्‍टरांच्‍या निगराणीखाली आहेत. ते लवकरात लवकर पुर्ण ठीक होतील, अशी आशा बाळगण्‍यात येत आहे. जन्‍माच्‍या वेळी या जुळ्यांचे वजन जवळपास 4.5 किग्रॅ एवढे होते.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या मुलांचे आणखी फोटोज...


 

बातम्या आणखी आहेत...