आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे आहे बलात्काऱ्यांचे गाव, प्रत्येक घराबाहेर लावला आहे असा नोटिस बोर्ड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या गावात राहणाऱ्यांना स्वावलंबी जीवन जगावे लागते. - Divya Marathi
या गावात राहणाऱ्यांना स्वावलंबी जीवन जगावे लागते.

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक असे गाव आहे जेथे फक्त बलात्कारी वा लैंगिक गुन्हा करणारे लोक राहतात. हे सत्य आहे. या गावाचे नाव आहे मिरॅकल व्हिलेज. फ्लोरिडापासून 2 मैलांवरील या गावात तब्बल 200 लोक राहतात. हे सर्व लोक गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणा आणि इतर गंभीर आरोप आहेत.  

 

बाल लैंगिक शोषणाचे गुन्हेगार राहतात येथे...
- या गावात बहुतांश अशा गुन्हेगारांना ठेवले जाते ज्यांच्यावर एखादा चाइल्ड सेक्स वा रेपचा आरोप आहे. वास्तविक, फ्लोरिडाच्या कायद्यानुसार शिक्षा भोगल्यानंतरही लैंगिक गुन्हेगारांना सर्वसाधारण रहिवासी परिसरापासून दूर ठेवले जाते, त्याचाच हा भाग आहे.

 

या जागांपासून ठेवले जाते दूर...
- कायद्यानुसार, चिमुकलीचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना शिक्षा भोगल्यानंतर शाळा, कॉलेज, कोचिंग, गेमिंग झोन वा अशाच एखाद्या रहिवासी परिसरापासून 2500 फुटांपर्यंत वावरायला बंदी आहे.

 

यामुळे झाली या गावाची निर्मिती...
- फ्लोरिडाच्या या कायद्यामुळे अशा लोकांना कुणीही घरी राहू देत नव्हते. यामुळे हे लैंगिक गुन्हा केलेले गुन्हेगार शिक्षा भोगल्यानंतर बेघर होतात. याच कारणामुळे फ्लोरिडाचे मंत्री Richard Witherow यांनी या गावाची निर्मिती केली. येथे लैंगिक गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या गुन्हेगारांना रजिस्ट्रेशननंतर ठेवले जाऊ लागले. 

 

घरासमोर लावला लागतो नोटिस बोर्ड...
- हे गाव बाहेरच्या जगापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. परंतु सर्वात चकित करणारी बाब अशी की, येथे ज्या गुन्हेगाराला घर दिले जाते, त्याच्या घरासमोर त्याच्या नावाची नोटिस लावली जाते. ज्यावर स्पष्ट शब्दांत लिहिलेले असते की, या व्यक्तीवर लैंगिक गुन्ह्याचे आरोप झालेले आहेत.

 

लहान मुले नाही राहत येथे..
सध्या येथे 150 रजिस्टर्ड गुन्हेगार राहतात. याशिवाय दर आठवड्याला असेच डझनभर लोक येथे अप्लाय करतात, ज्यांची पार्श्वभूमी हिंसा, ड्रग्जशी जोडलेली आहे वा ज्यांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण केलेले आहे. या गावात गुन्हेगारांना मुलांसोबत राहण्याची परवानगी नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या गावाशी निगडित आणखी फॅक्ट्स... 

बातम्या आणखी आहेत...