आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक वाटू लागले आनंदी आणि झाला या मुलीचा मृत्‍यू, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकोच्‍या 16 वर्षीय लॅना हॅमनचा मृत्‍यू सध्‍या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. लॅना आपल्‍या काही मित्रपरिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्‍यासाठी एका बीचवर गेली होती. तेथे मस्‍ती करत असताना अचानक तिचा मृत्‍यू झाला. पोस्‍टमार्टममध्‍ये तिचा हार्ट अटॅकने मृत्‍यू झाल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. मात्र एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक आल्‍याने सर्वच आश्‍चर्य व्‍यक्‍त करत आहे. मात्र खरे कारण त्‍यानंतर समोर आले.

 

मृत्‍यूपूर्वी लॅनाला वाटत होते एनर्जीटीक
- पोस्‍टमार्टम करणा-या डॉक्‍टरांनाही हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्‍यू झाला, हे पाहून आश्‍चर्य वाटले होते. मात्र जेव्‍हा त्‍यांनी तिच्‍या मित्रमैत्रीणीची चौकशी केली तेव्‍हा खरे कारण समोर आले.
- तपासादरम्‍यान तिच्‍या मित्रांनी सांगितले की, 'मृत्‍यूपर्वी लॅना म्‍हणत होती की, तिला फार चांगले वाटत आहे. अचानक तिला एनर्जीटीक फिल व्‍हायला लागले होते. मात्र त्‍यानंतर काही मिनिटांतच तिचा मृत्‍यू झाला.


हे आहे मृत्‍यूचे कारण
- पूर्ण तपासानंतर अधिकारी या निष्‍कार्षावर आले की, लॅनाचा मृत्‍यू एनर्जी ड्रिंक्‍समुळे झाला. ज्‍या जागेवर त्‍या सुट्ट्ंयासाठी गेले होते तेथील पाणी पिण्‍यालायक नव्‍हते. त्‍यामुळे लॅना पाणी पिण्‍याऐवजी वांरवार एनर्जी ड्रिंक्‍स पित होती. यामुळे तिच्‍या शरीरातील कॅफीनचे प्रमाण प्रचंड वाढले होते. शरीर या प्रमाणाला सहन करु शकले नाही.
- कॅफीनमुळे लॅनाला एनर्जीटीक वाटत होते. मात्र त्‍याच दरम्‍यान तिला हार्ट अटॅक आला. अत्‍याधिक कॅफीनची मात्राच तिच्‍या मृत्‍यूचे कारण बनले.


पुढील स्‍लाइडवर पाहा, लॅनाचे काही फोटोज...

 


 

बातम्या आणखी आहेत...