आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क कुत्रा चालवतो ट्रॅक्टर..शेतात मालकाला अशी करतो मदत;

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे. सर्कसमध्ये तुम्ही सायकल चालवणारा कुत्रा पाहिला असेल. परंतु, आम्ही आपल्यासाठी एका  इंटेलीजेंट डॉग कुत्राची माहिती घेऊन आलो आहे. हा कुत्रा ट्रॅक्टर चालवतो. इतकेच नाही तर शेतात आपल्या शेतकरी मालकाला कामात मदत करतो.

 

नॉर्दन आयलंडमध्ये राहाणारे अल्बर्ट रीड यांचा रॅम्बो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. असा इंटेलीजेंट कुत्रा तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल.

 

रॅम्बो असा चालवतो ट्रॅक्टर...
- 6 वर्षाच्या रॅम्बोचे मालक अल्बर्ट यांनी सांगितले की, शेतात काम करताना त्यांना रॅम्बोची मोठी मदत होते. पेरणी, कापणीत त्यांना रॅम्बो मदत करतो. रॅम्बो ट्रॅक्टर चालवतो तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नाही.

 

रॅम्बोला दिली खास ट्रेनिंग...
- ट्रॅक्टर चालवण्यासाठी अल्बर्टने यांनी रॅम्बोला खास ट्रेनिंग दिली आहे. अल्बर्ट यांच्या मार्गदर्शनाने रॅम्बो स्टेअरिंग फिरवतो. अल्बर्ट यांनी आपल्या ट्रॅक्टरममध्ये रॅम्बोसाठी खास सीटही बसवले आहे.

 

लांब-लांबून पाहाण्यासाठी येतात लोक..
- अल्बर्ट यांच्या रॅम्बोला पाहाण्यासाठी लांब-लांबून लोक येतात. अल्बर्ट सांगतात की, रॅम्बोला ट्रॅक्टर चालवतांना पाहून लोक थक्क होतात. रॅम्बोचे कोणी फोटो क्लिक करतो तर कोणी त्याचा व्हिडिओ शूट करतात.

 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा...रॅम्बो असा चालवतो ट्रॅक्टर...

बातम्या आणखी आहेत...