आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यासोबत फिरायला गेली होती ही व्‍यक्‍ती, रान डुकराने केला हल्‍ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्‍लंडच्‍या डीन परिसरात राहणा-या क्‍लाइव्‍ह लिलीने विचार केला नसेल की, त्‍याच्‍यासोबत मॉर्निंग वॉकला असेही काही घडेल. क्‍लाइव्‍ह आपल्‍या कुत्र्यासोबत घराजवळील डीन फॉरेस्‍टमध्‍ये फिरायला गेले होते. मात्र सकाळच्‍या अंधुक प्रकाशामुळे ते जास्‍त पुढे जाऊ शकले नाही.

 

हल्‍ला झाले कळलेही नाही

- जंगलामध्‍ये काही अंतर जाताच त्‍यांच्‍यावर रानडुकराने हल्‍ला केला. डुकराने त्‍यांच्‍यावर इतक्‍या वेगाने हल्‍ला चढवला की, त्‍यांना काही वेळ समजलेच नाही की नेमके काय झाले.
- ग्‍लव्‍स काढल्‍यानंतर त्‍यांच्‍या लक्षात आले की, त्‍यांचे बोट कापले गेले आहे.
- 53 वर्षीय क्‍लाइव्‍ह यांनी सांगितले की, 'सकाळी 7.30 वाजता अंधारामुळे फार काही दिसत नव्‍हते. त्‍यानंतर डुकराने एवढ्या वेगाने हल्‍ला चढवला की, कुत्र्यालाही समजले नाही की, नेमके काय झाले. नंतर मी ताबडतोब इमरजंसी सर्व्हिसला फोन केला. त्‍यानंतर मला रुग्‍णालयात नेण्‍यात आले. माझ्या एका बोटाचा डुकराने लचका तोडला आहे.'


या कारणामुळे हल्‍ला करत आहे प्राणी
- लोकल एक्‍सपर्टनूसार, वाइल्‍ड एरियाच्‍या आसपास घरे बनत असल्‍यामुळे प्राणी अन्‍नाच्‍या शोधात वसतींजवळ येत आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कशी झाली यांच्या बोटांची स्थिती...

 

बातम्या आणखी आहेत...