आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धांगवायू होताच पतीने सोडून दिले, नंतर ट्रेनरने बदलली अशी लाइफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरा रिचर्ड आणि 4 मुलांसोबत केलीचे आयुष्य सुखात चालले होते. परंतु एका घटनेमुळे केलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. इंग्लंडमधील यॉर्कशायर शहरात राहणाऱ्या या महिलेला स्पायनल स्ट्रोक झाला, ज्यामुळे कंबरेच्या खालील भागात तिला अर्धांगवायू झाला. डॉक्टरांनी सांगितले की आता ती कधीही चालू शकणार नाही. त्यानंतर पती रिचर्डने तुला घटस्फोट दिला.


यामुळे बदलेले केलीचे आयुष्य...
केलीने सांगितले की, अर्धांगवायू झाल्याचे तिला जेवढे दुःख झाले नाही तेवढे दुःख नवरा सोडून गेल्यामुळे झाले. दोघेही 14 वर्षांपासून एकत्र संसार करत होते. त्यावेळी केली आत्महत्या करण्याच्या विचारात होती. परंतु मुलांसाठी तिने आयुष्य जगण्याचा निश्चय केला. डॉक्टरांनी तिला स्वतःच्या पायावर चालण्यासाठी सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असे सांगितले.


ट्रेनरने बदलले आयुष्य
नवऱ्याने सोडून दिल्यानंतर केली एकटी पडली होती. स्वतःला लवकर बरे करण्यासाठी तिने एक पर्सनल ट्रेनर ठेवला. केलीने आपल्या फेसबुक पेजवर पर्सनल ट्रेनरची रिक्वायरमेंट टाकली आणि तिला कीथ मेसन नावाचा ट्रेनर मिळाला. कीथने केलीच हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यास खूप मदत केली.


आता सोबत राहत आहेत
35 वर्षीय कीथ यापूर्वी एक रग्बी खेळाडू होता. केलीची मदत करता करता दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. मागील एक वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. केली आणि तिळाचे मुलेही कीथसोबत आनंदी आहेत. केली आता पूर्णपणे ठीक झाली असून केथ तिच्यासोबतच राहतो.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...