आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मिडीयावर या फॅमिली फोटोजनी सध्या धुमाकूळ घातला आहे. तुम्हालाही वाटेत असेल की, हे फोटो असे का दिसताय? यावरुन इंटरनेटवर सध्या डिबेट सुरु आहे. मात्र यामागील सत्य जाणुन घेतल्यावर सगळेच हैरान होत आहे.
- ब्रिटनमधील एका परिवारने आपले हे फोटोज सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या कुटुंबातर्फे सांगण्यात आले आहे की, आम्ही फोटोंसाठी एका फोटोग्राफरला बोलावले होते. मात्र त्याने असे फोटो काढले की, यामुळे सर्वच चक्रात पडले आहेत.
एडिटिंगच्या नावावर केले असे काही
- या परिवारातीलच एक सदस्य Pam Dave Zaringने म्हटले आहे की, फोटोज क्लिक केल्यानंतर आम्ही फोटोग्राफरला ते चांगल्या पद्धतीने एडीट करण्याचे सांगितले होते. मात्र त्याने एडीटिंग केल्यानंतरचे फोटो आम्हाला दाखवले तेव्हा आम्ही हैरान झालो. त्याने तर आम्हाला भूतच बनवून टाकले. जास्त डार्कनेस असल्यामुळे फोटो, असे एडीट झाले, असे स्पष्टीकरण फोटोग्राफरने दिले आहे.
थट्टेचा विषय बनली फॅमिली
- Pam Dave Zaringने म्हटले आहे की, चांगल्या फोटोंसाठी आम्ही फोटोग्राफरला चांगली किंमत दिली होती. प्रत्येक फोटोसाठी आम्ही 250 डॉलर दिले होते. मात्र फोटो पाहिले तेव्हा आम्ही लोटपोट झालो. आम्ही त्याला काहीही म्हटले नाही व हे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले.
लाखो लोकांनी केले शेअर
- या परिवाराच्या या मजेशार फोटोंना सोशल मिडीयावर 3 लाखांहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटोग्राफरने क्लिक केलेले आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.