आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कोसळल्याने डोक्यावर असा परिणाम झाला की, डॉक्टरी पेशा सोडून बनले संगीतकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आकाशातून एखाद्या व्यक्तीवर तीन लाख व्होल्ट क्षमतेची वीज पडली तर त्याचे तुकडे होतील. पण अशा घटनेने एखाद्याचे जीवनही बदलून जाते. 1994 मध्ये डॉक्टर टोनी सिकोरिया यांचे जीवनही अशाचप्रकारे बदलून गेले. त्यांच्याबरोबर घडलेली घटना इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना समजली जाते. 


पेशाने डॉक्टर असलेले टोनी त्यांच्यावर वीज कोसळल्यानंतरही वाचले होते. पण या घटनेनंतर त्यांच्या मेंदूवर काहीसा विचित्र परिणाम झाला होता. काही दिवसांनंतर अचानक त्यांना पियानो वाजवण्याची इच्छा झाली. त्यानंतर त्यांनी अचानक डॉक्टरी पेशा सोडला आणि घरी एक मोठा पियानो घेऊन आले. विशेष म्हणजे टोनी यांनी पूर्वी संगीत आवडत नव्हते. त्यांना त्याविषयी तिरस्कार होता. पण या घटनेनंतर काही दिवसांत ते प्रसिद्ध संगीतकार बनले. 


कुटुंबीय घाबरले.. 
टोनी यांनी कामाला जाणे बंद केल्याने त्यांच्या कुटुंबीयांना चिंता झाली. टोनी दिवसरात्र पियानो वाजवत होते. त्यांनी एक क्लबही जॉइन केला. अखेर कुटुंबीयांनी त्यांना जे करायचे ते करू द्यायचे ठरवले. काही दिवसांतच टोनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामाने प्रसिद्ध झाले. पाहता-पाहता टोनी नॅशनल लेव्हलवर परफॉर्म करू लागले. त्यांच्या मेंदूत अचानक झालेल्या बदलामुळे हे घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


टोनीला नेमके काय झाले?
टोनी यांच्यावर वीज कोसळली तेव्हा ते 42 वर्षांचे होते. त्यांना आकाशातून कोसळलेल्या वीजेचा अगदी छोटासा धक्का बसला होता. तरीही त्यांना इजा झाली. मेडिकल रिपोर्ट्सनुसार वीज कोसळल्यानंतर टोनी यांच्या मेंदूतील काही सेल नष्ट झाले असतील. असे समजले जाते की, यानंतर बाहेर पडलेल्या न्यूरोट्रान्समिटर्समध्ये अनेक बदल झाले असतील. त्यामुळे त्यांच्या मेंदूतील असा भाग अॅक्टीव्ह झाला असेल जो साधारणपणे इतर लोकांमध्ये निष्क्रीय असतो. टोनीप्रमाणेच ब्रिटनच्या Derek Amato नावाच्या व्यक्तीच्या डोक्यावर दुखापत झाल्यानंतर त्यालाही संगीताची आवड निर्माण झाली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...