आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाच्या एका 35 वर्षीय महिलेला सत्य साई बाबाचे भक्तपद स्वीकारणे महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार Elena Smorodinova आपल्या पतीच्या मृत्यूनंतर एका अशा संस्थेच्या संपर्कात आली होती, जे लोक स्वतःला साई बाबाचे अनुयायी सांगतात. एलिनाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, या संस्थेशी एलिनाचा संबंध जुळल्यापासून तिने कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी संपर्क फार कमी केला होता.
उपवासाने झाला मृत्यू...
मीडिया रिपोर्टनुसार, या संस्थेमध्ये एलिनाला व्रताच्या निमित्ताने उपवास ठेवण्यास सांगितले होते. सलग तीन आठवडे उपाशी राहिल्यानंतर एलिनाचा मृत्यू झाला. एलिनाकडून हे सर्वकाही बळजबरी करून घेतले असा संस्थेवर आरोप आहे.
फॅशन डिझायनर चालवत आहे संस्था...
रशियातील Novosibirsk शहरात एक फॅशन डिझायनर स्वतःला सत्य साई बाबांची प्रतिनिधी सांगते. 2011 मध्ये सत्य साई बाबांच्या मृत्यूनंतर Baykova नामक महिला रशियात ही संस्था चालवत आहे. पतीच्या मृत्यूनंतर एलिना भक्त बनून येथेच राहत होती.
पुढील स्लाईड्सवर पाहा फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.