आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Cat Just Named The Most Awful Sleeping Face In Japan

PHOTOS: कुभंकर्णाप्रमाणे झोपते ही जपानी मांजर, 60 हजारांहून अधिक आहेत चाहते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अधिक काळ झोपण्यासाठी प्रसिद्ध जपानी मांजर सेत्सू चान)
आज आम्ही तुम्हाला अशा एका मांजरीविषयी सांगत आहोत, जिची कहाणी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. सोशल मीडियावर ही मांजर एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे प्रसिद्ध झाली आहे. 60 हजारांहून अधिक उत्साही लोक ट्विटरवर या मांजरीचे फॉलोअर आहेत.
होय, या जपानी मांजरीची सध्या बरीच चर्चा रंगतेय. या मांजरीचे नाव सेत्सू चान आहे. हिला मिळालेल्या एवढ्या प्रसिद्धीचे कारण आहे तिची झोप. ही मांजर केवळ आपल्या झोपेसाठी प्रसिद्ध आहे. जपानमधील अनेक प्रसारमाध्यमांनी तिला 'मोस्ट एवफूल स्लिपिंग फेस' असे संबोधले आहे. म्हणजेच ही मांजर कुंभकर्णाप्रमाणे झोपते. या क्यूट मांजरीला कितीही आवाज दिला, तरी ती झोपेतून उठत नाही. पाहिलंत काय कमाल आहे, या मांजरीची.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या क्यूट जपानी मांजरीची खास छायाचित्रे...