आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO: भुकेल्या मगरींच्या तलावात जेव्हा जिवंत मांजरीला फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुकेल्या मरगींच्या तलावात एक जिवंत मांजरीला फेकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेरुच्या एका शहरात हा प्रकार घडला आहे. तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या दोन माणसांनी या मांजरीला मगरींच्या तलावात फेकले. यावेळी दोघे मोठमोठ्याने हसत होते. ते एवढ्यावरच थांबले नाही. दोघांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले.
पाण्यात पडल्यावर मांजरीने स्वतःचा जीव वाचण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. ती पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वीही झाली. पण या तलावाच्या बाजूला बांबूंचे उभे कुंपण होते. त्यावरुन चढून जाणे सहज शक्य नव्हते. पण तिने चढण्याचा प्रयत्न केला. ती खाली पडली. तिने पुन्हा चढण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा खाली पडली. तोपर्यंत मगर तेथे येऊन पोहोचली होती. मांजरीचे प्रयत्न निष्फळ ठरले.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो आणि जिवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ....