आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या लंच बॉक्समध्ये क्रिएटीव्हिटी दाखवून वडील ठरले इंटरनेट सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये सेन फ्रन्सिस्कोच्या तटीये परिसरात राहणा-या बियू कॉफरॉन या व्यक्तीला 'लंच बॉक्स डॅड' म्हणून संबोधले जाते. कारण, तो आपली मुलगी ऐबीला विविध प्रकारचे दररोज डेलिशिअस आणि क्रिएटीव्ह लंच बॉक्स देतो. तिचा लंच बॉक्स पौष्टिक आणि आकर्षकसुध्दा असतो.
तो तिच्या लंच बॉक्समध्ये असे पदार्थ बनवून पाठवतो जे नार्निया, स्पायडरमॅन आणि डॉ. सिअससारख्या मुलांच्या पुस्तकात बघायला मिळतात. कॉफरॉन ऐबीच्या लंच बॉक्समध्ये कधी सँडविच तर कधी स्नॅक्स पाठवतो. लंच बॉक्समध्ये क्रिएटीव्हिटी दाखवणारा बियू कॉफरॉन इंटनेटवर आज सेलिब्रीटीप्रमाणे झळकायला लागला आहे.
फेसबुकवर बोर पांडा नावाच्या पेजवर कॉफरॉनची ही पोस्ट आहे. 19 तासांमध्ये या पोस्टला 2500 लोकांनी लाइक आणि 955 लोकांनी शेअर केले आहे. तुम्हीसुध्दा 'लंच बॉक्स डॅड' नावाने प्रसिध्द झालेल्या बियू कॉफरॉनची खास कलाकृती छायाचित्रांमध्ये बघू शकता.
बियू कॉफरॉनने लंच ब़ॉक्समध्ये दाखवलेली क्रिएटीव्हीटी छायाचित्रांमध्ये बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...