आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Girl Tried To Touch A Crocodile Inside The Enclosure

VIDEO: या धाडसी युवतीने मगरीच्या पिंजऱ्यात मारली उडी, बघा काय झाले नंतर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिकोमधील मॉन्टेरे येथील ला पास्तोरा झूमध्ये ही युवती फिरायला गेली होती. मगरीच्या खुल्या पिंजऱ्याजवळ आल्यावर या युवतीने आत उडी मारली. त्यानंतर तिने मगरीला हात लावण्याचा प्रयत्न केला.
खुल्या पिंजऱ्यात मगर अगदी शांतपणे झोपली होती. तिला हात लावण्यासाठी ही युवती पिंजऱ्यात उतरली. हळूवारपणे मगर असलेल्या जागी गेली. त्यानंतर तिने मगरीला हात लावण्याचा प्रयत्न केला. पण मगरीने तिच्यावर हल्ला चढवला. तिचा पाय दातांमध्ये पकडण्यासाठी लगेच मान पळवली. जबडा उघडला. पण समयसुचकता राखत या युवतीने स्वतःला मागे ढकलेले. त्यामुळे ती थोडक्यात वाचली.
पण या प्रसंगानंतर युवतीला तिने पत्करलेला धोका लक्षात आला. ती लगेच पिंजऱ्यावर चढून बाहेर आली. यावेळी तिच्या हृदयाचे ठोकेही वाढले होते. जिवावर आलेले संकट तिने चुकवले होते.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो....