आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Radar That Will Keep Vigil On Antarctic Sea Ice

अंटार्टिकावरील वितळलेल्या बर्फाची नोंद घेणार रडार यंत्रणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वाधिक बर्फाळ प्रदेशांपैकी एक असलेल्या अंटार्टिकावरील बर्फ दररोज वितळत आहे. त्यामुळे जलवायू परिवर्तनावरही गंभीर परिणाम होत आहे. हे संकट ओळखून ब्रिटिश शास्त्रज्ञांनी अंटार्टिकावरील बर्फाची स्थिती दर्शवणारे तसेच किती बर्फ वितळला आहे, हे निदर्शनास आणून देणारे एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. पाच वर्षांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी अंटार्टिकावर किती बर्फ होता आणि किती वितळला, हे सांगणारे कोणतेही तंत्रज्ञान आतापर्यंत अस्तित्वात नव्हते.
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी लंडन विद्यापीठाच्या मदतीने अंटार्टिकावरील पिने ग्लेशियर आयलँडवर नवे रडार लावले आहे. त्याद्वारे तेथे दररोज वितळणार्‍या बर्फाची माहिती मिळू शकेल. या रडारद्वारे अगदी लहान बदलांचीही नोंद घेतली जाते, हे प्रारंभिक परीक्षणातच सिद्ध झाले आहे. एवढेच नाही, तर बर्फाच्या स्थितीत थोडा बदल झाला तरी रडार सिस्टिमवर त्याची माहिती दिली जाईल. या सिस्टिममधील प्रत्येक रडार 6 व्हॉट बॅटरीवर चालेल अणि त्याची क्षमता वर्षभराची असेल.
या बॅटरीज उन्हाळ्यात पवनऊर्जेवर आणि सौरऊर्जेवर चार्ज होतील. रडारवर सर्व माहिती एकत्रित होईल, त्या वेळी 5 व्ॉटची ऊर्जा आवश्यक आहे. पिने ग्लेशियर आयलँड हा हवामान बदलाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील असल्यामुळे तेथे ही रडार सिस्टिम बसवण्यात आली आहे. तेथे ही यंत्रणा लावल्यामुळे संपूर्ण अंटार्टिकावरील स्थितीचे अध्ययन करता येईल.